*R. O. Water - समज आणि गैरसमज*
*R. O. Water - समज आणि गैरसमज*
आज सर्वच लोकांमध्ये पिण्याच्या पाण्या विषयी सजगता दिसून येते. बरेच लोक mineral water (की जे demineralised असते) , R.O चे पाणी अत्यंत शुद्ध आणि सुरक्षित म्हणून पिताना दिसतात. R.O. चे purifier घरात असणे देखील उच्च सामाजिक आणि आर्थिक स्तर असण्याचे मापदंड होत आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा की हे पाणी खरंच शरीराला फायदेशीर आहे ???
*सर्व प्रथम R. O. म्हणजे काय ते समजून घेऊया..*
R. O. म्हणजे Reverse Osmosis. या साठी रसायन शास्त्रातील Osmosis ही संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे.
*Osmosis*
ही शरीरातील अशी प्रक्रिया आहे की या द्वारे शरीरातील द्रवाचे वहन हे अती low solute concentration कडून high solute concentration कडे होते. हे वहन होताना त्या द्रावाला एका जाळीसदृश माध्यमातून (semi permeable membrane ) मधून जावे लागते. या प्रक्रियेचा उपयोग अनेक प्रकारे दिसून येतो . उदा. झाडाची मुळे ही भूगर्भातील पाणी ओढतात ते या osmosis च्या सिद्धांता मुळेच.तसेच रक्तातील पाणी हे किडनी कडे खेचले जाणे हे देखील या osmosis मुळेच होते.
*Reverse Osmosis म्हणजे काय ?*
Osmosis ही प्रक्रिया उलट प्रकारे घडवून आणली जाते. या मध्ये high solute concentration असणाऱ्या द्रावला low solute concentration असणाऱ्या द्रावा कडे semi permeable membrane( जाळी) च्या माध्यमातून पाठवले जाते. या प्रक्रिये मध्ये अनेक क्षार (positively charged ions) ह्या जाळी मध्ये अडकतात.त्या मध्ये K+, Ca++, Mg++, P+ असे ( Na+ चे molecular weight कमी असल्यामुळे अडकत नाही). वरील सर्व घटक हे क्षारीय म्हणजेच alkaline reserve असून शरीरातील अनेक घटकांचा pH समतोल राखण्यासाठी मदत करतात.