*फवारणी करताना शेतकऱ्यांनी अशी दक्षता घ्यावी*
*फवारणी करताना शेतकऱ्यांनी अशी दक्षता घ्यावी*
पोषक वातावरण असल्याने पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. किडनियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीवर भर दिला जात आहे. मात्र आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर विषबाधा होण्याची अधिक शक्यता आहे. पुढील अनर्थ टाळण्यासाठी फवारणी करताना दक्षता घ्यावी. पावसाने विश्रांती घेताच, शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, फवारणी करताना आवश्यक ती दक्षता न घेतल्यामुळे चार वर्षांपूर्वी शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे प्रकार वाशिमसह अन्य जिल्ह्यातही समोर आले होते. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबत कृषी विभागाने जनजागृती सुरू केल्याचे दिसून येत आहे. तरी फवारणी करणारा आणि फवारणी करते वेळी त्या सोबत असणाऱ्या व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यावी...
*फवारणी करताना काय करू नये?* - किटकनाशकाची वाहतुक अन्नपदार्थासोबत करु नये. - किटकनाशके लहान मुलांच्या हाती लागू देवू नये. - किटकनाशकाचा डबा हा अन्न अथवा पाण्याकरिता वापरु नये. - किटकनाशकांची वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये. - नोझल साफ करण्यासाठी तोंडांनी फूंकर मारु नये. - फवारणी करताना धुम्रपान / तंबाखू तसेच काहीही खाणे पिणे टाळावे. - किटकनाशके व तणनाशके फवारणीसाठी एकच पंप वापरू नये. - फवारणीचे द्रावण बनविण्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ किवा पिण्याचे पाणी ठेवू नये. - उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी.
*काय दक्षता घ्यावी?* नोझल साफ करण्यासाठी तार, काडी किंवा टाचणीचा वापर करावा. - डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे