Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*"ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.*

----------------------------------------------- रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात.

*कसे करावे ओम् उच्चारण?*

ओम् उच्चारण करण्यासाठी आरामदाई स्थितीत बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. फायदा *ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम :* १)मानवी मनाची शुद्धता करणे. २)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे. ३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे. ४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे. *ओम् कार जप :* अ......उ.....म् ……… अ......उ......म्......... अ......उ.......म्…………….. *ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण* ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात.

*१. थायरॉईड -* ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो. *२. अस्वस्थता -* तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. *३. तणाव -* यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात. *४. रक्तप्रवाह -* यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. *५. पचन -* ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते. *६. स्फूर्ती -* ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो. *७. थकवा -* थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही. *८. झोप -* ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते.

Next posts