Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*ऋतूनुसार आरोग्यावर होणारे परिणाम*

*ऋतूनुसार आरोग्यावर होणारे परिणाम* रोग झाल्यावर तो बरा करण्यासाठी तर सगळेच प्रयत्न करतात पण रोग होऊच नये म्हणून खूप कमी जण त्याची दक्षता घेतात. त्यासाठी रोग कसे व कशामुळे होतात ते माहीत असायला पाहिजे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे भौगोलिक वातावरण, पाणी, हवा या सारख्या गोष्टी बदलत असतात. तसेच वेगवेगळे ऋतू हे देखील आपल्या आरोग्यावर परिणाम असतात. प्रत्येक ऋतूनुसार आपला आहार आणि विहार यामध्ये बदल करणे गरजेचे असते. प्रत्येक ऋतूने शरीरात काय बदल घडतात हे पाहणे अत्यंत गरजेचे असते. याकडे जर व्यवस्थित लक्ष दिले तर आजार होत नाहीत उलट आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते व आरोग्य सुधारते. एकच प्रकारचा आहारविहार सर्व ऋतूंमध्ये लागू पडत नाही म्हणून बदल आवश्यकच असतो. ऋतूनुसार आहार-विहारात बदल न केल्यास आपल्या शरीरातील त्रिदोष म्हणजेच कफ, वात आणि पित्त यांचा समतोल बिघडतो. त्यामुळे अनेक व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. वाताचा प्रकोप वर्षा ऋतूत होतो, त्याचप्रमाणे पित्ताचा प्रकोप शरद ऋतूत तर कफाचा प्रकोप वसंत ऋतूत होत असतो. ऋतूनुसार योग्य आहार घेतल्याने आपण त्या-त्या ऋतूंमध्ये प्रकोप होणाऱ्या त्रिदोषांना आणि त्यामुळे होणाऱ्या व्याधींना तर दूर ठेवू शकतोच शिवाय योग्य आहार आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करत असतो. एकंदरच निरोगी आयुष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ऋतूनुसार आहारविहारात बदल करणे आवश्यक आहे. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये सहा ऋतू सांगितले आहेत त्यानुसार आपण बदल करणे गरजेचे आहे

Next posts