*साखरे ऐवजी गुळ का वापरावा...*
*साखरे ऐवजी गुळ का वापरावा...*
उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे.
*गुळ खाण्याचे हे आहेत फायदे :*
*👉🏽 हिमोग्लोबिन वाढवते-* ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. 100 ग्रॅम गुळामध्ये 11 mg लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गूळ फार उपयुक्त असते.
👉🏽 *रक्तदाब नियंत्रित ठेवतो-* गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
*👉🏽पचनशक्ती सुधारते-* गुळामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच गूळ खाण्यामुळे नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
*👉🏽 स्त्रियांसाठी उपयुक्त-* सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी गुळ खाणे उपयुक्त असते. कारण मासिक पाळी, अयोग्य आहार यांमुळे स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी आढळते. यासाठी वयात येणाऱ्या मुली, मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांनी गुळाचा आहारात जरूर समावेश करावा. गरोदरपणातही लोहाचे खूप महत्त्व असते. यासाठी गरोदर स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरीनंतरही गूळ हितकारी असतो.
*आयुर्वेदानुसार गुळाचे महत्व आणि गुळाचे फायदे :* आयुर्वेदात गुळाचे खूप महत्व आहे. त्यामुळे