*व्हेज माहित आहे मात्र, वेगन म्हणजे काय आहे*
*व्हेज माहित आहे मात्र, वेगन म्हणजे काय आहे* आपल्या देशात प्रामुख्याने अनेक नागरिक व्हेज जेवण करतात, व्हेज शाकाहारी म्हणजे काय हे सर्वाना माहित आहे. मात्र जगात आता यापुढचा वेगन खाद्य प्रकार समोर येतो आहे. तर 1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा होतो. वेगन मध्ये फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा समावेश होतो. महत्त्वाची बाब अशी की वेगन डाएटमध्ये दूध, दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खात नाहीत. सोबतच प्राण्यांपासून मिळणारं मांस, दूधापासून तयार करण्यात येणारा कोणताही पदार्थ खाण्यास मनाई आहे. जर तुम्ही तुमच्या डाएटमधून मांस, दूध आणि अंडी पूर्णपणे काढून टाकत असाल तर तुम्हाला त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी डाएटमध्ये फळ, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा लागणार आहे.
*व्हेगन डाएटचे प्रकार*
*व्होल व्हीट वेगन डाएट :* यामध्ये फळं, भाज्या, डाळ, ड्रायफ्रुट्सचा समावेश करण्यात येतो.
*रॉ फूड वेगन डाएट :* या श्रेणीमध्ये कच्ची फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स किंवा वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो.
*थ्राइव डाइट :* या डाएटमध्ये व्होल व्हीट आणि रॉ फूड या दोन्ही पदार्थांचा समावेश करण्यात येतो. वेगन कितीही चांगले असले तरी आपण भारतीय लोकांनी याचा अवलंबून करणे योग्य ठरेलं याची शक्यता खूप कमी आहे. कारण भारतातील महिन्यानुसार बदलणारे ऋतुचक्र आणि त्यानुसार आपल्या शरीरात होणारे बदल या नुसार आपण भारतीयांनी पारंपरिक आहाराच घेणे