श्री गणेश पूजन आणि २१पत्री याची माहिती
*१. मधुमालती / मोगरा* मधुमालती म्हणजे मालती किंवा चमेली (शास्त्रीय नाव - Jasminum sandac/Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.
*२. भृंगराज / माका* भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.
*३. बिल्व / बेल* बेलाची पाने (Aegle Marmelos). बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतडय़ाच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.
*४. दूर्वा* दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.
*५. बदर / बोर* बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus jujuba /Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.
*६. धत्तूर / धोत्रा* धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura metale/ Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.
*७. सुरसा / तुळस* तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म)