२. दुसरी ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी -
२. दुसरी ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी - ही वनस्पती आयुर्मान वाढवते. हिच्यामुळे स्मरणशक्ती वाढते. ही रक्तदोषांना संपवते आणि स्वर मधुर करते. म्हणूनच ब्राह्मीला सरस्वतीही म्हटलं जातं. ही मन आणि मेंदूला मजबूत करण्याचं काम करते. जठर आणि लघवी संबंधित व्याधींना शरीरातून बाहेर टाकते.
३. चंद्रघंटा म्हणजेच चंद्रशूर किंवा चमसूर - ही वनस्पती कोथिंबिरीसारखी असते. हिच्या पानांची भाजी करतात, जी खूप पौष्टिक असते. ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते, म्हणून हिला चर्महंती असंही म्हणतात. शक्तिवर्धक, हृदयरोगाला बरं करणारी अशी ही चंद्रिका वनस्पती आहे.
४. कुष्मांडा म्हणजेच कोहळा - कोहळ्यापासूनच पेठा ही मिठाई केली जाते. कोहळा शरीरातील बळ वाढवतो. वीर्य वाढवतो. रक्ताचे विकार बरे करतो. पोट साफ ठेवतो. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली आहे, त्यांच्यासाठी कोहळा हा अमृतासमान आहे. हा शरीरातील दोषांना दूर करत हृदयरोग बरा करतो. पित्ताचा त्रास याने बरा होतो.
५. स्कंदमाता म्हणजेच अळशी किंवा जवस - वात, पित्त, कफ अशा व्याधींचा नाश अळशी करते.
६. कात्यायनी म्हणजेच अंबाडी - अंबा, अंबिका, अंबालिका, माचिका अशा वेगवेगळ्या नावांनी अंबाडी ओळखली जाते. पित्त, कफ तसेच गळ्याचे आजार यांना बरी करते.
७. काळरात्री म्हणजेच नागदवण ही वनस्पती सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करते. मन आणि मेंदूचे विकार बरे करते. विजयश्री मिळवून देते. या वनस्पतीची लागवड घरी करावी. ही वनस्पती घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकत घराला सौख्य मिळवून देते. ही सर्व प्रकारच्या विषावरही जालिम उपाय आहे.
८. महागौरी म्हणजेच तुळस - तुळस ही एक सर्वांच्या ओळखीची औषधी वनस्पती आहे. ही प्रत्येक घरात लावली जाते. तुळस सात प्रकारची असते - पांढरी, काळी, मरुता, दवना,