जागतिक मधुमेह दिन
Published
मधुमेह ही व्याधी आज सर्वांच्या परिचयाची झाली असून; या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष असे, ६० व्या वर्षांच्या सरासरी आयुर्मानात पडणाऱ्या या आजाराचा विळखा आता तिशीतच पडू लागला आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढते असल्याने १० लाख व्यक्तींची मधुमेह चाचणी एका दिवसात करण्यात आली. यात ९ टक्के लोकं मधुमेह या आजाराच्या विळख्यात अडकले असून त्यांना याची माहितीच नसल्याचे चाचणीतून उघड झाले. एका दिवसाच्या तपासणी मोहिमेतून ९६ हजार व्यक्तींना मधुमेह असल्याचे निदान झाले. मधुमेह हा वेळीच ओळखून त्यावर योग्य वेळी उपाय केले की नक्कीच मधुमेहपासून सुटका होऊ शकते किंवा शरीराच्या इतर अवयवांना निर्माण होणारा धोखा टळू शकतो...