Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

✍️केस गळती प्रामुख्याने हिवाळ्यात दिसत असेल तर त्याचे कारण हे पावसाळ्यात शरीरीत तयार झाले असते.

✍️ऋतूनुसार पावसाळ्यात वात दोषाचा संचय व प्रकोप होतो.ज्याचे दुष्परिणाम पुढील ऋतुत भोगावे लागतात. ✍️वात दोषाचे काम हे सुदृठपणे अस्थिंचे पोषण करणे. हे पोषण जर निट झाले नाही तर हाडांच्या झिजेचे प्रमाण वाढते. वाताचे विकार याच काळात जोर पकडतात. ✍️ सप्तधातुतील अस्थी या धातुचा मल म्हणजे केश. धातु उत्तम असेल तर मल कमी तयार होतो. मलाचीही गुणवत्ता उत्तम असते. जसे मेथीची जुडी विकत आणल्यावर ती निवडताना जूडी जेवढी ताजी तेवढाच जुडीतील निघणारा टाकाऊ भाग कमी शिवाय तोही खराब नाही. याप्रमाणेच हाडांच्या आरोग्याशी केसांचे आरोग्य अबलंबुन आहे. ✍️वाताची योग्य चिकित्सा हीच केसांची चिकित्सा. वैद्याकडून नाडी व पचन तपासणी करायला हवी. त्यानुसार वैद्य पोटातुन पाचक व बृंहण औषधी देतात. ✍️केस हा अस्थीचा मल आहे. केसांच्या मुळांना सतत हवा व उन्ह लागत राहले तर मुळांशी असलेल्या तैलग्रंथीच्या कार्यावर परिणाम होती व केसांमधे कोरडेपणा येतो म्हणून केस मोकळे सोडण्या ऐवजी बांधुन ठेवावे. डोक्यावर पदर वा स्कार्फ वा टोपी वापरावे. ✍️ बाह्य उपचारासाठी केस ताकाने, शेतातील चार वित खोल काळ्या मातीने मेंदीसारखा लेप करुन धुवावे. कढीपत्ता व चहा पावडर यांच्या काढ्याने केस धुणे. शिकेकाई व वाळा यांच्या काढ्याने केस धुणे.शिवाय आजाराच्या कारणानुसार अनेक बाह्य उपचार असतात. ✍️शाम्पू पंधरा दिवस वा महिन्यात एकदाच वापरावा. ✍️केसांना धुर्धूरपत्रादी तैल, निलीभृंग्यादी तैल, महाभृंगराज तैल, आमला आॅईल तैलाने नियमित लावणे. पंचकर्म सेंटरमधे यासाठी शिरोबस्ती उपचार उपलब्ध असतात.

Next posts