Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

कडुनिबांचे फायदे..

कडूलिंब हा वृक्ष अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म धारण करणारा म्हणून ओळखला जातो. हे खरे असले तरी कोणत्या विकारावर कडूलिंबाचा कसा वापर करावा, याचे ज्ञान नसल्यामुळे आपल्या आसपास अनेक झाडे असूनही आपण विविध विकारांवर त्याचा वापर करत नाही. अशा प्रकारचा वृक्ष सोडून देऊन आपण शरीरात विष निर्माण करणारी इतर औषधे वापरत बसतो.

लिंबाचे इतर अनेक उपयोग बघण्यासाठी त्वचेच्या सौंदर्यासाठी काय उपयोग होतात हे बघणे मनोरंजक ठरणार आहे. शरीराच्या सौंदर्यामधला कडूलिंबाचा सर्वात मोठा वापर म्हणजे सौंदर्यपिटीका कमी करणे. तरुण मुला-मुलींमध्ये हा त्रास जाणवतो. त्यावर अनेक प्रकारची औषधे वापरली जातात.

काही वेळा तारुण्यपिटिका ङ्गुटून चेहरा काळा पडतो. अशा अडचणींवर कडूलिंबांचा उपयोग होतो. कडूलिंबाची काही पाने गोळा करावीत आणि ती पाण्यात टाकावीत. पाणी गरम करावे. प्रदीर्घकाळ पाणी गरम केल्यास लिंबाच्या पानांचा हिरवेपणा कमी होतो. म्हणजेच पानांचा अर्क पाण्यात उतरलेला असतो. या पाण्याने चेहरा धुवावा. मुरुम कमी होतात. हेच असे उकळलेले पाणी स्नानाच्या पाण्यात मिसळावे किंवा बाथटबमध्ये टाकावे. त्याचा वेगळा उपयोग त्वचेला होतो. लिंबू, चंदन, हळद यांचा वापर चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी होतो किंवा त्वचेच्या तुकतुकीतपणासाठी होतो.

तसा कडूलिंबाचा वापर होत नाही. कडूलिंबामुळे शरीराला त्रस्त करणारे काही संसर्ग कमी होतात. म्हणजे कडूलिंब आपल्या त्वचेवरची इन्ङ्गेक्शन्स् कमी करतो आणि परिणामी इन्ङ्गेक्शन्मुळे होणारे त्रास वाचतात. आपल्या शरीरावर पडणार्‍या सुरकुत्या किंवा पांढरे छोटे डाग हे आपल्या शरीरातल्या काही प्रक्रियांमुळे पडत असतात.

Next posts