Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

देह दान केल्यानंतरचे संशोधनाचे निष्कर्ष

36 वर्षांच्या तरूणाला कर्करोग झाला जो शेवटच्या टप्प्यावर होता. तरूणपणात त्याने कधीही गुटखा, सिगारेट, पान, तंबाखू आणि दारूचे सेवन केले नाही. वेळेवर कामावर गेला, त्याला कसले वाईट व्यसन नव्हते. कुटुंबासह सुखी होता. त्याला कसला आजार नव्हता, चिंता नव्हती. फक्त 2/3 दिवसांपासून पोटात दुखणे सुरू झाल्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू केले. पण कोणताही फायदा न झाल्यामुळे, त्याच्या वडीलांनी मोठ्या डॉक्टरांना भेटून त्याचे सर्व अहवाल तेथे दाखविले आणि त्यांना कळले की पोटाच्या आतड्यांमध्ये कर्करोग आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, उपचारा दरम्यान घर गहाण ठेवले. दागिने विकले गेले, परंतु परिणामी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरानी कुटुंबाला त्याचा अग्नि संस्कार न करण्याचा सल्ला दिला. त्यांना मानवी सेवेसाठी शरीरावर संशोधन करण्यासाठी रुग्णालयात दान करा असे सांगितले. आणि त्यांनी दान केले. संशोधनानंतर असे आढळून आले की प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने त्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे त्यांना कर्करोग झाला होता... त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या खाण्यापिण्या विषयी चौकशी केली. त्याला चहा पिण्याची सवय होती. तो दिवसातून पाच ते सहा कप चहा प्यायचा. मग हे सुद्धा समजले की आपण जिथून चहा मागवतो तो चहा प्लास्टिकच्या पिशव्यांमधून येत असे आणि चहा प्लास्टिकच्या कपा मध्ये दिला जात असे. अनेकदा असे दिसून आले आहे की लोकांना दुकानातून प्लास्टिकच्या पिशव्यांमधून गरम चहा, गरम भाज्या, सुप किंवा इतर तत्सम वस्तू घ्याव्या लागतात, ते खातात किंवा पित असतात, ते हळूहळू तुमच्या शरीरात कर्करोगाचे जंतू तयार करतात.

Next posts