Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

#Janu basti #Basti# dhara# Lep Chikitsa*आमवात (Rheumatoid arthritis)*

#Janu basti #Basti# dhara# Lep Chikitsa*आमवात (Rheumatoid arthritis)*

- आमवात हा वातव्याधी प्रकारच आहे. आधुनिक शास्त्रात आमवातालाच ‘हृमॅटॉइड आर्थ्रायटीस’ असे म्हणतात व तो एक ऑटोइम्यून डिसीज आहे. ४० ते ६० वयोगटातील व्यक्तींना जास्त प्रमाणात होतो. स्त्रियांमध्ये हा आजार पुरुषांपेक्षा सहापटीने जास्त प्रमाणात होतो. तसेच तरुणाईत किंवा लहानमुलांमध्ये देखील आढळते.

*आमवातातील आहार:-* आमवातात या सर्व औषधी चिकित्सेबरोबरच आमाचे महत्त्व लक्षात घेता, आहारावर नियंत्रण असणे खूप महत्त्वाचे आहे. आहार रुक्ष, लघु, उष्ण, दीपनपाचन करणारा हवा, या दृष्टीने बाजरीची भाकरी बरोबर लसूण आहारात वापरणे आवश्यक आहे.

– कुळीथाचा युष हाही आमवातावरील एक महत्त्वाचा चिकित्सोपक्रम आहे. यासाठी २ चमचे कुळीथ शिजवून त्यापासून तयार होणारे कढण लसणीची फोडणी देऊन प्यावे.

– यव, कुळीथ, वरी-नाचणीसारखी क्षुद्र धान्ये, रक्तशालीपष्टीक, शेवगा, कारली, पुनर्नवा, पडवळ, आले, लसूण व उष्णोदक हे पथ्यकर पदार्थ आहेत.

– ताक हे ही पथ्यकर आहे. तसेच दही, मासे, गुळ, दूध, तळलेले पदार्थ, उडदाचे पदार्थ, नासलेल्या दूधाचे पदार्थ हे विशेष अपथ्यकर आहेत.

– विरुद्धाशन, विषमाशन, रात्री जागरण, दिवास्वाप, वेगधारण ही विशेष अपथ्ये आहेत. रुग्णांनी सांध्यात वेदना व सांधी सुजलेले असता बाहेरून बाजारांत मिळणारी कुठलीही तेले आणून लावत बसू नये. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आमवात आहे की संधिवात आहे याचे योग्य निदान करून योग्य औषधोपचार करावेत. कारण फक्त एरंडतेल सोडून इतर तेलानी आमवात वाढतो

#Janu basti #Basti# dhara# Lep Chikitsa*आमवात (Rheumatoid arthritis)*

Next posts