*पावसाळ्यात दूध प्यायल्याने कफ होतो असं अनेकजण म्हणतात पण ते खरं की खोटं?*
*पावसाळ्यात दूध प्यायल्याने कफ होतो असं अनेकजण म्हणतात पण ते खरं की खोटं?*
दूध हा आपल्या रोजच्या डाएटमधील एक महत्वपूर्ण भाग मानला जातो. आपल्यापैकी बऱ्याचजणांना सकाळी नाश्त्याला किंवा रात्री झोपायच्या आधी दूध पिण्याची सवय असते. काहींना गरम दूध प्यायला आवडते तर काहींना थंड दूध आवडते. परंतु पावसाळयात आणि थंडीत थंड दूध प्यायल्याने आपल्याला कफ होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पावसाळ्यात नेमके दूध प्यावे की पिऊ नये असा प्रश्न आपल्याला पडतो. खरं पहायला गेलं तर पावसाळा हा संसर्गाचा ऋतू आहे. या काळात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होतात. त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. प्राचीन आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारकशक्ती व पाचनशक्ती ही तुलनेने कमी होते. त्यामुळे या काळात पोटासाठी पचायला हलके आणि उबदार अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पावसाळ्यात आपल्या डाएटमध्ये उकडलेल्या भाज्या आणि सूपचा समावेश केला तर आपले आरोग्य चांगले राहून, पाचनशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. अनेक आयुर्वेद तज्ञानी पावसाळयात दूध पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. जेणेकरून पावसाळ्यातही दूध प्यायल्याने कफ होण्याची समस्या न उद्भवता आपली पाचनशक्ती व रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यात मदत होते.
*1 दुधात पाणी मिसळण्याचा सल्ला दिला जातो.* उन्हाळ्यात आपण फ्रिजमधून बाहेर काढलेले थंड दूध पिणे पसंत करतो. परंतु पावसाळयात वातावरणातील गारव्यामुळे पावसाळ्यात फ्रिजमधील थंड दूध पिण्याची ही सवय आपल्याला बदलावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात दूध नेहमी कोमट प्यावे