*लाडक्या बाप्पा ला अर्पण करणाऱ्या 21 प्रकारची पत्री कोणती आहे आणि त्यांचे आयुर्वेदिक महत्व काय आह…
*लाडक्या बाप्पा ला अर्पण करणाऱ्या 21 प्रकारची पत्री कोणती आहे आणि त्यांचे आयुर्वेदिक महत्व काय आहे, ते जाणून घेऊ.* (पार्ट -2)
*मधुमालती*
भारतामध्ये ओलसर जागेवर सर्वत्र आढळणार्या या वनस्पतीचा उल्लेख अष्टांगसंग्रह, सुभूतसंहिता, राजनिघंटु, तसेच संस्कृत साहित्यातील शाकुंतल, मालविकाग्नीमित्र, विक्तोमोर्वशीय इ. ग्रंथसंपदेमध्ये आढळतो.
*रुई*
रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही. रुईच्या पानांची पत्रावळ गाईचे तूप किंवा एरंड तेल लावून तव्यावर गरम करून छातीला / पाठीला बांधून ठेवणे फुफ्फुसे स्वच्छ होण्यास मदत करतात. रुईचे औषधी महात्म्य हे भरपूर आहे.
*हादगा*
हादग्याच्या पानाची व फुलाची भाजी करतात.
*कणेरी*
कण्हेरीचे सर्व भाग विषारी असून मुळे, साल व बियांमध्ये अनेक ग्लायकोसाइडे असतात; त्यांची क्रिया हृदयावर डिजिटॅलिनासारखी होते. सालीत थोडे टॅनीन व बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. पानांमध्ये ओलिअँड्रिन हे हृदय-बलवर्धक द्रव्य असते.
*बेलपत्र*
बेलाचे फळ पोटाच्या विकारावर फार औषधी आहे. फळाचा मुरंबा करतात. भावप्रकाश, सुश्रुत साहिंता, भैषज्य रत्नावली आदी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत माहिती दिलेली आहे. उष्णताहरक, वात कफ शामक, रेचक, दीपनकारी, हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील मुत्रशर्करा कमी करणारा अशी बिल्व फळाची ओळख आहे.
*दूर्वा*
दूर्वा ही शीतल गुणधर्माची वनस्पती आहे. उष्णतेमुळे नाकातून रक्त आल्यास नाकात दुर्वांचा रस पिळला जातो. त्वचेचे तेज वाढण्यासाठी दुर्वा वाटून लेप चेह-याला लावला जातो. मूत्र विकारांवर दूर्वारस उपयुक्त ठरतो.