Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*पित्त दोष*

*पित्त दोष*

*अत्याधिक पित्ताचा त्रास, शरीरात जागोजागी सूज येणे, रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब, जळजळणे, पोट झाडणे, त्वचेवर फोड, चट्टे उठणे,अनिवार इच्छा उठणे* अश्या समस्या सारख उद्भवतात तर असू शकतो पित्त दोष

- *योग्य आहाराचे सेवन करा* पित्ताचे शमन करणाऱ्या आहाराचे सेवन करा (कडवट, तुरट, मधुर चवीचा आहार). दुध, तूप, लोणी हे उत्तमरीत्या पित्ताचे शमन करतात. आंबट फळांऐवजी गोड फळे खा. मध आणि काकवी सोडून बाकी गोड वस्तूंचा वापर करू शकता.

*-पित्त कश्या मुळे होते:-* पित्त वाढविणाऱ्या अन्नाचे सेवन (तिखट, आंबट, खारट, मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि लाल मांस), कॉफी, ब्लॅक टी, निकोटीन (धुम्रपान), अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ, उन्हात सतत वास्तव्य, भावनिक ताण, अतिश्रम किंवा/आणि अतिआळस

*-योग्य आरामाची वेळ* कार्यशीलता आणि विश्रांती ह्यात योग्य समन्वय साधा. कामातच फार गुंतून राहू नका किंवा खूप लोळणे टाळा.

*-चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्या* नियमित आहार घ्या आणि चांगल्या संगतीत आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा.

*-ध्यान करा आणि कृतज्ञ रहा* ध्यान करा आणि आपल्या पित्त प्रकृतीच्या भरकटणाऱ्या मनाला स्थिर करा. तसेच तुम्हाला लाभलेल्या सर्व गोष्टींची यादी करा आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव ठेवा.

*-मुख्य योगासने* मार्जारासन​, शिशू आसन, चंद्र नमस्कार, उत्कटासन, भुजंगासन, विपरीत शलभासन, पश्चीमोत्तानासन, अर्धनौकासन, अर्धसर्वांगासन, सेतूबंधासन, शवासन, योगिक श्वास

*पित्त दोष*

Next posts