मिलेटस्/Millets म्हणजे काय?
:- मिलेटस् म्हणजे भरडधान्ये वा तृणधान्ये, ज्याला इंग्रजी भाषेत Millets वा small seeded grass असे म्हणतात. Millets म्हणजे मोटा अनाज. या Millets ला Nutricereals वा Superfood असे म्हटले जाते. मिलेटस् चा इतिहास 5000 ते 6000 वर्षे पूर्वीपासूनचा आहे. आपल्याला भरडधान्ये म्हटले की लगेचच फक्त दोन धान्ये डोळ्यासमोर येतात , ती म्हणजे गहू (wheat) आणि तांदूळ (paddy rice). त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज होती , त्याला अनुसरून पहिली हरितक्रांती घडविण्यात आली , गव्हाचे तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ लागले, वेगवेगळ्या जाती वाण आणले गेले अन् देशाची पोटाची भूक भागविण्यात आली. परंतु परिणामी आपली आरोग्यदायी भरडधान्ये तृणधान्ये या हरितक्रांतीच्या धबगड्यात वेगाने बाजूला फेकली गेली. तसेच हि भरडधान्ये म्हणजे डोंगर कड्याकपारीत राहणाऱ्या गरीब लोकांचे अन्न म्हणून हिणवले गेले आणि आपल्या सारख्या लोकांच्या जेवणाच्या थाळीतील खाण्याची जागा घेतली गव्हाच्या चपाती पोळीने मैदा पाव बिसकुटाने तांदळाच्या भाताने अन् इथूनच आरोग्याच्या समस्यांचे दुष्टचक्र सुरू झाले. तत्कालीन सरकार व प्रशासन शास्त्रज्ञ यांच्यासमोर भल्यामोठ्या लोकसंख्येला पोटाला अन्न देणे हे महत्त्वाचे होते अन् ती तत्कालीन प्राथमिकता होती. आता आपले डोळे उघडले आहेत, आता आपण परत आपल्या पन्नास वर्षापूर्वीच्या अन्नाकडे वळायचे आहे आणि परत आपल्याला पूर्वीच्या प्रमाणे सुदृढ व्हायचे आहे , जैवसाखळी/ Biodiversity निर्माण करायची आहे. मिलेटस् प्रोत्साहन, मानवी आरोग्य व्यवस्थापन अन् जैवसाखळी/Biodiversity पुनर्रस्थापना, पर्यावरण,अर्थकारण यामध्ये मिलेटस् ची भूमिका काय हे समजून घेऊया* -- संपूर्