Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

गुलाल कोणाचा ही असो डोळ्यात गेल्या नंतर नुकसान करणार...

डोळे हा अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक अवयव असल्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. सध्या निवडणूकीचे वातावरण असून निवडणुकीत किंवा विजया नंतर उधळणाऱ्या गुलालाने डोळ्यांना इजा पोहचू शकते तसेच धूळ, माती, यांच्यामुळे देखील डोळ्यांना इजा पोहचू शकते. गुलाल डोळ्यात गेल्यानंतर डोळ्यांची जळजळ होणे, त्यातून पाणी येणे, डोळ्यात खुपणे असे अनेक त्रास संभवतात. त्यामुळे डोळ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच अनेक वेळा प्रवासादरम्यान डोळ्यामध्ये माती किंवा कचरा जातो. अथक प्रयत्न केल्यानंतरही डोळ्यात गेलेला कचरा काढणं शक्य होत नाही. अशावेळी काही सोप्या पद्धतीने आपण डोळ्यात गेलेला कचरा काढू शकतो.

डोळ्यात गुलाल किंवा कचरा गेल्यावर करा ‘हे’ उपाय

१. सुती कापड पाण्यामध्ये भिजवावे. या ओल्या कापडाने डोळ्यांच्या कडा हलक्याशा दाबाव्यात. फक्त हा दाब देत असताना डोळ्यामधील कोणत्याही जागेवर जोर पडणार नाही याकडे लक्ष द्यावे.

२. डोळ्यांवर गार पाणी शिंपडावे किंवा एका बशीत पाणी घेऊन १-२ सेकंदासाठी त्यात डोळा उघडझाप करावा. हे करत असतांना डोळ्यात पाणी जातं मात्र घाबरु नये. या साठी विशिष्ट आकाराचे कप ही मिळतात, ते ही वापरू शकतो.

३. अनेक वेळा पापण्यांवर धूळ साचते अशावेळी डोळ्याच्या वरच्या बाजूला असलेल्या पापण्या खालच्या पापण्यांवर ठेवाव्यात आणि डोळ्यांची हळूहळू उघडझाप करावी.

४. डोळ्यात गुलाल गेल्यास डोळ्यावर हळूवार फुंकर मारावी.

५. डोळ्यात काही गेल्यावर त्या क्षणी डोळ्यांची उघडझाप करावी. जेवढ्या लवकर तुम्ही ही कृती कराल. तेवढा डोळ्यातील गुलाल किंवा इतर कचरा दूर होण्याची शक्यता जास्त असते.

Next posts