अभ्यंगं कारयेन्नित्यं सर्वेष्वंगेषु पुष्टिदम् ।। शिरःश्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत्॥६५
अभ्यंगाचे गुणः– अभ्यंग (अंगाला तेल लावण) रोज करावा. याचे मर्दन सर्वांगास तर करावेंच, पण विशेषकरून डोळे, कान आणि पाय या अवयवांस अभ्यंग जरूर करावा.
अभ्यंगोपयोगी तैले— मोहरीचे तेल, चंदनादि . तेल, किंवा अनेक तऱ्हेच्या सुवासिक पुष्पाचे संस्कार करून सुगंधी बनविलेले तेल, रोज अंगाला लावण्यास -- योग्य असून हें तेल केव्हांही दुष्ट होत नाहीं.
अभ्यंगो वातकफहच्छमशान्तिबलं सुखम् ॥ | निद्रावर्णमृदुत्वायुष्कुरुते देहपुष्टिकृत् ॥६७
अभ्यंगाचे विशेष गुण:-अभ्यंगाचे नित्य शीलना पासून वायु, कफ यांचा नाश होऊन शम, शांति, बळ आणि सुख, झोप, वर्ण आणि शरीरमार्दव हे गुण | वाढतात आणि आयुष्य व देह यांची उत्तम पुष्टि होते. अभ्यंगः शीलितो मूर्ध्नि सकलेन्द्रियतर्पकः ॥ दृष्टिपुष्टिकरो हन्ति शिरोभूमिगतान्गदान् ॥६८ केशानां बहुतां दा मृदुतां दीर्घतां तथा ॥ कृष्णतां करुते कुर्याच्छिरसः पूर्णतामपि॥ ६९ कर्णरोगा न मलं न च मन्याहनुग्रहः ॥ नोचैःश्रुतिर्न बाधिर्य स्यान्नित्यं कर्णपूरणात् ॥७०
रोज अभ्यंगाचा उपयोग शिरावर केल्यास त्यापासून सर्व इंद्रियें तृप्त होतात. दृष्टीची पुष्टि उत्तम होऊन शिवाय डोक्यावर उत्पन्न होणारे सर्व विकार ( खवडे चाई, टक्कल ) वगैरे नष्ट होऊन, केस पुष्कळ, दृढ आणि मऊ, लांब आणि काळेभोर होतात; शिवाय डोक्याचेंही पूरण होतें. मस्तकास तेल चोळण्यापासून कर्णरोग, कानांतील मळ, मान, हनुवटी यांचा ग्रह होत नाहीं. शिवाय, बहिरेपणा जाऊन योग्य तऱ्हेनें ऐकूं येते