*उपवास करण्याचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आहे. पण उपवास केल्याने आपल्याला मिळणारे शारीरिक व मान…
*उपवास करण्याचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आहे. पण उपवास केल्याने आपल्याला मिळणारे शारीरिक व मानसिक फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?*
योग्य पद्धतीने उपवास केल्यास आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात.
*शरीर होतं डिटॉक्स* काही जण फराळचे सेवन करून उपवास करतात तर काही लोक नऊ दिवस कडक व्रत ठेवतात. वेगेवगळ्या वैद्यकीय पद्धतीमधील माहितीनुसार, आपलं शरीर पूर्णपणे डिटॉक्सिफाय करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ पुरेसा असतो. म्हणजे उपवासाच्या निमित्ताने या नऊ दिवसांत अनावश्यक तसंच विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. पण आजारपणात उपवास करावा किंवा करू नये? कशा पद्धतीने करावा? याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला आठवणीने घ्यावा. आपण ज्या खाद्यपदार्थांचे सेवन करतो, त्याचे सकारात्मक तसंच नकारात्मक परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही होत असतात; ही बाब लक्षात घ्यावी. नवरात्रीच्या दिवसांत व्रतादरम्यान सात्विक भोजन व फलाहार केल्यानं शरीर आणि मनाला सकारात्मक ऊर्जेचा पुरवठा होतो. योग्य पद्धतीने उपवास केल्यास शरीरासह मानसिक आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते.
- उपवासादरम्यान तुमची पचन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू असते, याचा तुम्ही अनुभव घेतला असेलच. कारण पौष्टिक-सात्विक अन्नपदार्थ, फलाहाराच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात.
- पौष्टिक खाद्यपदार्थ आपल्या पचन संस्थेची खोलवर स्वच्छता करतात. या प्रक्रियेदरम्यान नसापेशींच्या दुरुस्तीचे कार्य देखील पार पडते.
- आतड्यांमधील सूज, यकृताशी संबंधित विकार-जखम, अल्सर इत्यादी समस्या नैसर्गिकरित्या ठीक होण्यास मदत मिळते.
- योग्य पद्धतीने उपवास केल्यास पचन प्रक्र