*2 जुन - Dentist Day* 🦷👅
दातांचे आरोग्य फारच महत्त्वाचे असुन. मौखिक आरोग्य तुम्हांला एका निरोगी जीवनाकडे नेईल. (संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनामध्ये तोंडाच्या(मौखिक) आरोग्याचा फार मोठा वाटा आहे). आपले दात जागेवर धरून ठेवण्यासाठी हिरड्या त्यांच्या भोवती असतात. हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी, मुखाचे आरोग्य राखणार्या सवयींचा अवलंब करा.
दररोज किमान दोनदा ब्रशने दांत स्वच्छ घासा, दररोज एकदा तरी दातांमधील फटी व्यवस्थित साफ करणे, आणि दातांच्या डॉक्टरकडे नियमितपणे जाण्याचे वेळापत्रक राखा. आपल्या हिरड्या लाल आणि सुजलेल्या असतील आणि त्यांमधून चटकन रक्त येत असेल तर त्यांना जंतुसंसर्ग झाला आहे असे समजा. त्वरित उपचाराने तोंडाचे आरोग्य पुन:श्चा मिळवा. उपचार न केल्यास खूपच गंभीर परिणाम होऊ शकतात. आणि दात पडू लागतात.
*तोंडाच्या आरोग्यासाठी सर्वसाधारण सूचना*
👉🏽 नरम ब्रिसलचा ब्रश वापरा. 👉🏽 प्रत्येक जेवणानंतर खळखळून चुळा भरा. 👉🏽 अडकलेले अन्नकण काढण्यासाठी दात व्यवस्थित साफ करा. 👉🏽 तोंड कोरडे पडू लागल्यास लाळेचे प्रमाण वाढवण्यासाठी बिनसाखरेचे च्युइंगम चघळु शकता. 👉🏽 स्नायूंना व्यायाम घडविण्यासाठी कडक व दाणेदार पदार्थ खा. 👉🏽 मद्यार्कविरहित माउथवॉशचाच वापर करा कारण मद्यार्कयुक्त माउथवॉशने तोंड कोरडे पडते. 👉🏽 जीभ स्वच्छ आहे ह्याची खात्री करण्यासाठी टंग क्ली्नर वापरा. 👉🏽 जिभेवर जीवाणूंचा थर जमल्यास हॅलिटोसिस सारखे रोग होऊ शकतात. टूथब्रशने देखील जीभ स्वच्छ करता येते. 👉🏽 पडून गेलेल्या दातांच्या ठिकाणी खोटे दात बसवावे (इंप्लांट्स) म्हणजे क्राउन्स आणि ब्रिजना आधार मिळतो व चेहर्याची एकंदर ठेवण चांगली दिसते. 👉🏽 दांत झिजले असल्यास, तुम्ही विविध