ग्रीष्म ऋतुचर्या
AC मुले होणारे तोटे
सतत ac मध्ये राहिल्याने शरीरामध्ये घाम निर्माण होणे कमी होते, व त्यामुळे शरीरातील असती धातूला दौर्बल्य प्राप्त होते, हाडे ठिसूळ बनतात.
सततच्या AC मुळे त्वचेला रुक्षपणा प्राप्त होतो, थंड-गरम अश्या विरुद्ध टेम्परेचर मुळे रक्तदोष निर्माण होऊन त्वचा रोग होऊ शकतो. तसेच कफ दोष निर्माण होऊन सर्दीचे आजार होतात.
त्याकरता उपाय म्हणजे दोन ते तीन तासांच्यावर ac चा वापर करू नये.
तापमान अति थंड ठेवू नये, AC च्या अति वापराने मेधा वृद्धी होऊन स्थौल्य निर्माण होते.
बंदिस्त जागेमध्ये कूलर चा अतिवापर निमोनिया व तत्सम टीबी सारखे आजार होऊ शकतात, त्याचबरोबर फॅन च्या देखील अतिवापरामुळे शरीरामध्ये वात वृद्धी होऊन हाडे ठिसूळ बनतात, शरीराला सूज येते, आलस्य, दौर्बल्य, तंद्रा, अग्नी मांद्य निर्माण होते.
त्यामुळे फॅन चा गरजेपुरता वापर करावा.
उन्हाळ्यात घ्यायचे द्रव पदार्थ-
आमसूल सरबत आणि कोकम सरबत वाळा घातलेले माठातील थंडगार पाणि चिंचापानक कैरीचे पन्हे लिंबू सरबत
तसेच तुळसबीज व सब्जा, धने, जिरे, कोथिंबीर, ताक. वरील पदार्थ बर्फ न टाकता घ्यावे.
फळे-
नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा द्राक्षे योग्य प्रमाणात काळे मनुके अंजीर सफरचंद अननस
उष्णता वाढू नये म्हणून आहारीय पदार्थ, साळीच्या लाह्या, तुपातील शिरा, आमरस, गुलकंद, केशर+दूध, खीर-गावाच्या रव्याची खीर. धणे+जिरे पाणि (उकळले) पालेभाजी सूप कोहळा रस पेठा बर्फी
इत्यादी पदार्थ व पेय आयुर्वेद प्रमाणे सांगितल्याप्रमाणे घेतल्याने आपण बर्याचश्या उन्हाळ्यातील आजारांपासून स्वतःचे राखसं करू शकतो.
आयुर्वेदिक दिनचर्या, विशेषतः उन्हाळ्यातील आहार-विहारासंबंधी अधिक माहिती साठी आजच आमच्या क्लिनिक मध्ये संपर्क साधून अधिक माहिती जा