केसांचे विकार आणि उपचार !
केसांचे आरोग्य व सौंदर्य ह्यांचे महत्व आपण जाणतो, ह्यामुळेच आपण सर्वजण मग ते महिला असो किंवा पुरुष सगळेच आपल्या केसांचे आरोग्य जपण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात.
आपण बाजारात मिळणारे अनेक केशतेल व शाम्पू आणि विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधने केसांसाठी वापरतो आणि तरी देखील केसांच्या समस्या उद्भवतात.
केसांच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकतात, ह्याला असंतुलित आहार, प्रदूषण, केसांची अपुरी व अनियमित स्वच्छता, आणि केमिकल युक्त हेअर प्रॉडक्ट्स चा अतिवापर, अश्या बऱ्याच कारणांमुळे केसांचे आरोग्य धोक्यात येत असते.
दैनंदिन जीवनात आपण केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जात असतो, ह्यामध्ये अधिक केस गळणे, तरुण वयात केस पांढरे होणे, केसांना फाटे फुटणे, अकाली टक्कल पडणे आणि केसात कोंडा होणे असे अनेक लक्षण आपल्याला दिसतात.
केसांच्या सर्व विकारांवर आयुर्वेदिक उपचार पद्धती खूप उपयुक्त आहे, आयुर्वेदामध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी व केसांच्या विकारांवर विशिष्ट उपचार वर्णित केले आहेत.
आम्ही श्री विश्वसुधा आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये केसांच्या सर्व समस्यांवर प्रभावी आयुर्वेदिक उपचार करतो.
आजच आमच्याशी संपर्क करा !
संपर्क क्रमांक- 9881947290