मधुमेहामुळे होणारे आजार
भारतातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे, ह्याचे मुख्य कारण म्हणजे असंतुलित जीवनशैली आणि आहाराचे बदलते समीकरण.
मधुमेह किंवा डायबेटिसचे दोन प्रकार असतात, टाईप-१ आणि टाईप-२ डायबेटीस. टाईप-१ ह्या प्रकारमध्ये शरीरातील इन्सुलिन स्रवत नाही किंवा ते अत्यंत कमी प्रमाणात स्रवते, अश्या रुग्णांना इन्सुलिन घेतल्याशिवाय जगणे अवघड असते.
टाईप-२ प्रकारामध्ये इन्सुलिन कमी प्रमाणात स्त्रवते, ह्या रुग्णांमध्ये मधुमेह योग्य औषध उपचारांनी नियंत्रित करता येतो. टाईप-२ हा प्रकार मुख्यतः असंतुलित आहार आणि जीवनशैलीमुळे होतो.
मधुमेहामध्ये रक्तातील साखर सतत वाढत असल्याने शरीरातील इतर अवयवांवर विपरीत परिणाम होऊन विविध आजार उद्भवतात.
मधुमेहामुळे होणारे आजार-
किडनीचे आजार-
क्रोनिक किडनी फेल्युअरच्या कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे मधुमेह आहे, सामान्यतः किडनीमध्ये प्रत्येक मिनिटाला १२०० मिली रक्त प्रवाहित होऊन शुद्ध होते. आणि मधुमेह नियंत्रणात नसेल तर किडनी द्वारे प्रवाहित होणाऱ्या रक्ताचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढते ह्यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि हे किडनीसाठी नुकसानकारक असते असे दीर्घकालीन चालू राहिल्यास उच्चरक्तदाब वाढू शकतो आणि त्याने किडनीची कार्य करण्याची क्षमता अधिकच खालावू शकते
उच्चरक्तदाब-
उच्चरक्तदाब आणि मधुमेह-
उच्चरक्तदाब आणि मधुमेह ह्यांना एकत्रितपणे अतितीव्र आजार म्हणून ओळखले जाते, अश्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असते.
मधुमेहामुळे उच्चरक्तदाब होऊ नये ह्यासाठी गोड पदार्थ कमी खाणे, जीवनशैलीमध्ये बदल करणे, सकस पोषक आहार घेणे, वजनावर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम करणे गरजेचे असते.
तसेच ह्या सर्वांचे असंतुलन झाल्यास उच्चरक्तदाबास