उन्हाळ्यात वाढणारे आम्लपित्त आणि त्वचा विकार आणि आयुर्वेदीय दृष्टिकोन !
उन्हाळा, आम्लपित्त आणि त्वचा विकार हे समीकरण नेहमीच आपण ऐकत आलो आहोत.
उन्हाळा चालू झाला कि पित्ताचा त्रास देखील बळावताना दिसतो, पण खरेतर आम्लपित्त आणि उन्हाळा ह्यांचा थेट असा काही संदर्भ बघायला मिळत नाही.
मग उन्हाळा चालू झाला कि आम्लपित्ताचा त्रास का अधिक प्रमाणात बघायला मिळतो?
अनेक रुग्णांच्या तक्रारींचे सूक्ष्म निरक्षण केल्यानंतर असे लक्षात आले कि उन्हाळ्यातील जीवनशैली आणि आहार-विहार हे प्रमुख कारणे आहे.
प्रामुख्याने आपण उन्हाळा सुरु झाल्यावर आहारात अचानक बदल करतो, थंड आहार आणि पेय घेण्यावर आपला अधिक भर असतो कारण कडक उन्हाने आपल्या शरीराची लाही-लाही होत असते अश्याने आपण नको त्या आहाराचे सेवन करत असतो.
उन्हाळ्यात एकतर पाणि कमी पिले जाते किंवा अत्यम्बु पान होते म्हणजे जास्त पाणी पिले जाते, असे केल्यास दोन्हीमुळे त्रास होतो.
पाणि कमी पिले कि किडनी स्टोन, मुत्राशमरी, घामाचा दुर्गंध, उष्णताजन्य पिटिका, त्वचेला लाली, दाह होणे , लालसर चट्टे व गांधी उठणे, आम्लपित्त, भ्रम, चक्कर येणे, शिर शूल व डिहायड्रेशन होऊन रक्तदाब कमी होणे, थकवा आणि उष्मघात होऊ शकतो.
पाणी जास्त पिले कि अग्निमांद्य, अजीर्ण उलट्या, जुलाब, शोथ सूज येणे थायरॉईड चा विकार, वजन वाढणे, मेदोवृद्धी व मधुमेह असे आजार होऊ शकतात.
जेवढी तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे, द्रव आहार, फळे, लिंबू पाणी, ताक, पन्हे, सालीच्या लाह्या आणि नारळ पाणि ह्यांचा आहारात समावेश करावा.
ह्यासोबतच उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि वाढत्या गर्मीमुळे आपण बाहेर जाणे टाळतो अश्याने शरीराच्या हालचाली कमी होतात आणि व्यायामाअभावी आपले शरीर असे जड पदार्थ लवकर पचवू शकत नाही