*किती खावं प्रोटीन रोज?*
*किती खावं प्रोटीन रोज?* वजन कमी करायचं तर भरपूर प्रोटीन खा असं ऐकून तुम्हीही खूप प्रोटीन खाताय, उसळी- नॉनव्हेज-पनीर-सोयाबिन पण एवढं प्रोटीन खाणं खरंच फायद्याचं आहे की त्याचे दुष्परिणामच जास्त होत आहेत... वजनावर नियंत्रण मिळवणं हा फार पूर्वीपासून माणसाला असणारा जणू ध्यास आहे आणि असं असलं तरी स्थूलतेचं जगभर वाढणारं प्रमाण ही देखील सत्य परिस्थिती आहे. गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये वजन,स्थूलता, व्यायाम यांचं प्रस्थ खूपच वाढलं आणि मग देश विदेशात डाएटची असंख्य फॅड जन्माला आलीत आणि गेलीत! एक एक डाएट चर्चेत आलं की त्याची जणू जगभर लाट येते ! मग तेच डाएट कसं उत्तम आहे याचे दाखले- पुरावे दिले जातात. मग काही महिन्यांनी दुसरं काहीतरी येतं आणि पहिलं मागे पडतं असं वर्षानुर्वष घडत आलं आहे. मग त्यातूनच कार्बोहायड्रेट , प्रोटिन्स,फॅट्स असे शब्द वारंवार कानावर येऊ लागले. जिममध्ये जायचं, भरपूर व्यायाम करायचा, घाम गाळायचा आणि मग स्नायूंची ताकद आणि त्याचप्रमाणे आकार वाढलेला दिसावा म्हणून काहीतरी प्रोटीन पावडर किंवा इतर काही सप्लिमेण्ट यांचा आहारात समावेश करायचा असा एक ट्रेण्ड सुरु झाला. ‘काही आहारतज्ज्ञांचा या ट्रेण्डला विरोध आहे. त्यांच्यामते, कशाला हव्यात या महागड्या प्रोटीन पावडरी आणि सप्लिमेण्टस. आपली कडधान्यं काय कमी गुणकारी आहेत का !’ मग भरपूर प्रमाणात भिजवलेली कच्ची अथवा उकडलेली कडधान्यं खाल्ली जाऊ लागली! यात मग अगदी हिरव्या मुगापासून तर छोले, हरभरे, राजमा, वाटाणे या सगळ्यांचा समावेश झाला. पनीर, सोया मिल्क, सोया चंक्स हे ही त्यातून सुटले नाहीत. गहू दळून आणताना त्यात सोयाबीन दळले जाऊ लागले. हे इतकं वाढलं की लहान मुलांना देखील उत्तम वाढीसाठी प्