Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*मोरिंगा पावडर म्हटलं की उत्तम आणि शेवग्याच्या पानांची पावडर म्हणलं की दुर्लक्ष,*

*मोरिंगा पावडर म्हटलं की उत्तम आणि शेवग्याच्या पानांची पावडर म्हणलं की दुर्लक्ष,* किती बदललो ना आपण भारतीय, इंग्रज आले ही आणि गेले ही परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आणखी ही गुलामी सोडली नाही, हेच आपलं दुर्भाग्य, शेवग्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आपण पूर्वी पासून आहारात उपयोग करत आलो आहोत आणि हो शेवग्याच्या पानांची पावडर ही आपले आज्जी आजोबा वापरायचे परंतु ते विसरून शेकडो रुपये खर्च करून मोरिंगा पावडर घरी आणून खाताना व्हिटॅमिन मिनरल्स चा विचार आपण हल्ली करत आहोत, परंतु आपण घरी देखील अशी पावडर बनवून आहारात वापरू शकतो ते ही अगदी केमिकल फ्री...

" शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, खाण्यासाठी तर झाडाची साल डिंक मिळवण्यासाठी वापरतात. शेवग्याच्या झाडाच्या ताज्या हिरव्यागार पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, अॅन्टिऑक्सिडंट आणि अमिनो ॲसिड असतात. पाने वाळवून पावडर करून ठेवणे व आहारात वापरणे अधिक सोईचे आहे. वाळलेल्या पानांची पावडर वर्षभर टिकते. झाडांची ताजी हिरवीगार पाने तोडून स्वच्छ धुवावीत आणि उन्हामध्ये वाळवावीत. उन्हात वाळवताना त्याला संरक्षित पद्धतीमध्ये शक्यतो सोलार ड्रायरचा वापर करून वाळवावे म्हणजे त्यावर कचरा, धूळ, किडे अथवा इतर घाण बसणार नाही आणि स्वच्छ वाळलेली पाने मिळतील. तसेच वेळही वाचेल. वाळलेली पाने मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यावीत. ही पावडर भाजी, वरण, भाकरी, पराठे अथवा सुपमधून वापरता येईल.

*पानाचे आरोग्यादायी फायदे*

■ लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे रक्तक्षय कमी होण्यास मदत होते. ■ हाडांना मजबुती येते. ■ मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर. शरीरातील दाह कमी होतो. ■ झिंकचे प्रमाण असल्यामुळे केस गळती

Next posts