*हवी आहे फ्रोजन शोल्डर पासुन सुटका*
*हवी आहे फ्रोजन शोल्डर पासुन सुटका*
फ्रोजन शोल्डरचे दुखणे म्हणलं तर प्रत्येक घरात एक तरी असा आढळतो ज्याने हे दुखणे अनुभवले असते, प्रचंड वेदना व सतत वेदना असल्याने रोजची कामे देखील करता येत नाही. तसेच हे दुखणे फक्त खांद्याचे नसून त्यांत मानेच्या व पाठीच्या कांही मणक्यांत दोष असतो. मानेचे व पाठीचे वरचे पाच सहा मणके दबलेले चिकटलेले, एकावर एक चढलेले किंवा त्यांतील अंतर खूप कमी झालेले असते. कांही वेळा हाताच्या बोटांना मुंग्या येत असतात. अशा वेळेस आधुनिक वैद्यक तज्ज्ञ वेदनाशामक गोळ्या घ्यावयाचा सल्ला देतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण रोग पूर्णपणे बरा होत नाही. या तक्रारीकरिता आयुर्वेदाची अनेक औषधे, गुग्गुळ कल्प, अभ्यंग तेले, लेप गोळ्या बराच गुण देतात. उदा. सिंहनाद, लाक्षादि, गोक्षुरादि, त्रिफळा गुग्गुळ, वातगजांकुश इ. अशा तक्रारींनी पिडलेल्या रुग्णाने तत्काळ कोणतेही तेल म्हणजे गोडे तेल, तिळाचे तेल, एरंडेल चार भाग व गवती चहाचा अर्क एकत्र मिसळून सकाळी स्नानाचे अगोदर, रात्रौ झोपताना संबंधित हात, खांदा, मान यांना हलक्या हातांने जिरवावे. संपूर्ण हाताला खालून वर, खांदा व मान यांना गोल अशा पद्धतीने तेल चोळावे. एअर कंडिशनर, पंख्याचे थेट वारे, थंड पेये, आईस्क्रीम, लस्सी, बर्फ, लोणची पापड, खूप खारट, आंबट व थंड पदार्थ टाळावे. शक्यतो कठीण उबदार अंथरूण ब्लँकेट, गोधडी वापरावी. उशी, गादी टाळावी. जादा वजन उचलणे, एका हाताने पाण्याने भरलेली बादली उचलणे, तसेच खूप शारीरिक कष्टाची कामे टाळावी. कृश व्यक्तींनी खूप खूप लंघन न करिता माफक प्रमाणात उडीद, डिंक किंवा हाळीवाचे लाडू खावे. नेहमी शरीरातील रक्ताचे प्रमाणावर लक्ष असावे. कोणतेही शारीरिक काम घाईगर्दीने, हिसक