सोबतचा व्हिडिओ बघून आयुर्वेद ग्रेट आहे याची प्रचिती येते.आयुर्वेद हे अतिप्राचीन शास्त्र आहे.आपल्य…
सोबतचा व्हिडिओ बघून आयुर्वेद ग्रेट आहे याची प्रचिती येते.आयुर्वेद हे अतिप्राचीन शास्त्र आहे.आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी दिव्य दृष्टीने प्रत्यक्ष आजाराचे निदान व त्याची चिकित्सा सांगितली आहे . आता यांत्रिकीकरणाचा युगात यंत्राद्वारे आपण ते काही प्रमाणात पडताळून पाहू शकतो.आणि आपसूकच आयुर्वेद चिकित्सा देऊन रुग्ण सेवा करीत असल्याचा अभिमान जागृत होतो. Colon हा मोठ्या आतड्याचा मुख्य भाग,तो सेकम पासून गुदाश यात जातो.जो मल उत्सर्जित होण्यापूर्वी अन्न अवशेषातून आद्रता काढतो. आयुर्वेदीय पंचकर्म उपक्रमातील बस्ती हा एक उपक्रम. बस्ती ही वात दोषासोबतच अन्य दोषांवरील श्रेष्ठ चिकित्सा.पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत जुनाट वा नवीन आजारांसाठी त्याच्या लक्षणानुसार, तीव्रतेनुसार आम्ही बरचसे वैद्य रुग्णांना बस्ती हा पंचकर्मातील उपक्रम प्रथम करावा लागेल असे सांगतो. बस्ती म्हणजे औषधी युक्त तैल,काढा गुद मार्गाने आत सोडणे.म्हणजे ऐनीमा सारखी प्रक्रिया पण ऐनीमा नव्हे,(ऐनीमा चा उपयोग मलनिरहरणासाठी होतो)तर बरेच रुग्ण म्हणतात अहो डॉक्टर आमचं पोट साफ होते.संडासला साफ होते.काही अडचण नाही.मग आम्ही त्यांना समजेल या भाषेत आपल्याला पोट साफ नाही करायचे तर पोटातले,धातू मधील दोष काढायचे आहेत .ते एका दिवसात नाही २१ वा ३३ दिवस सलग बस्ती घ्यावा लागेल.असे सांगतो, एनिमा मध्ये एका दिवसात पोट साफ होईल पण बस्ती मध्ये आपल्याला वर्षानुवर्षे मोठ्या आतड्यांमध्ये, धातू मध्ये चिकटून पडलेला,सडलेला मलभाग त्या त्या दोषासहित आतड्यांना इजा न करता बाहेर काढावा लागेल. सविस्तर माहिती आपण आपल्या जवळच्या वैद्याकडून घेऊ शकतो. जय आयुर्वेद.