*डोळयासमोर अंधारी*
*डोळयासमोर अंधारी*
चक्करयेण्या'पेक्षा वेगळा प्रकार म्हणजे डोळयापुढे अंधारी येऊन खाली पडणे किंवा जागच्या जागी बेशुध्द होणे. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा अचानक कमी पडणे. ही घटना अनेक कारणांमुळे घडते.
👉🏽 अतिरक्तदाब असताना अचानक उभे राहणे. 👉🏽 अल्परक्तदाब. यामुळे मेंदूत रक्तपुरवठा कमी होतो. 👉🏽 पोटातील चलनवलन एकदम (वायू, विकार, कळ) बदलून रक्तप्रवाहात घट येणे. 👉🏽 अतिवेदनेमुळे चेतासंस्थेवर तात्पुरता परिणाम होऊन त्यामुळे रक्तदाब अचानक कमी पडणे.
यापैकी कारणे असतील तर उभी असलेली व्यक्ती खाली पडते. पण खाली पडल्यावर हृदय व मेंदू एकाच पातळीवर येऊन मेंदूचा रक्तप्रवाह लगेच सुधारतो. यामुळे ती व्यक्ती तात्पुरती बेशुध्दी संपून लगेच सावध होते. काहीवेळा अचानक खाली पडलेल्या व्यक्ती काही क्षणानंतर आपोआप सावध कशा होतात हे यातून समजते. अशी व्यक्ती *चक्कर येताना खाली पडत असल्यास तिला उभे धरून ठेवणे चुकीचे आहे.* कारण यामुळे मेंदूस रक्त पोहोचणार नाही. याऐवजी या व्यक्तीस हलकेच सुरक्षित आडवे होऊ देणे महत्त्वाचे आहे. हा महत्त्वाचा प्रथमोपचार आहे. काही आजारांमध्ये केवळ आडवे झाल्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्याची फारशी शक्यता नसते.
👉🏽 रक्तस्राव, 👉🏽 रक्तप्रवाह थांबणे, 👉🏽 मेंदूत रक्तस्राव होणे, 👉🏽 रक्तवाहिनी अरुंद होणे, 👉🏽 हृदयविकाराचा झटका, 👉🏽 शोष (शरीरातले पाणी कमी होणे),
या आजारांमध्ये मेंदूचा रक्तपुरवठा कमी राहिल्याने ही स्थिती दीर्घकाळ राहते. इतर काही आजारांमुळे चक्कर येण्यासारखी भावना दिसते. खूप ताप,दृष्टिदोष, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे (उपास, मधुमेहात जादा इन्शुलिन दिल्याने किंवा इतर कारणाने), इत्यादीं