*जेवणाच्या ताटत पांढरे विष...?*
साखर,मीठ,मैदा,पांढरे तांदूळ, बटाटा यांचा समावेश आहे. यांना पांढरं विष म्हणण्यामागे त्यांच्यातील गुणधर्म कारणीभूत ठरतात.अभ्यासात आढळून आलं आहे की,पांढरे तांदूळ आहारात जास्त प्रमाणात असल्यास टाइप २ डायबिटीज चा धोका वाढतो.तळलेले बटाट्याचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास कर्क रोग, मधुमेहाचा धोका वाढतो. निरामय आरोग्य व सुदृढ शरीर यासाठी आहारात जास्तीत जास्त पोषक घटक असणं गरजेचं असतं.पण बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातील पोषक घटकांचं प्रमाण कमी व आरोग्यास हानिकारक घटक जास्त झाले आहेत.धावपळी- च्या जगण्यात प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड यांचं आहारातलं प्रमाण वाढलं आहे,पण या बदललेल्या आहाराशैलीमुळे ताटात पांढर्या विषाचं प्रमाण वाढलं आहे.
◆ताटातले पांढरे विष ●साखर -अभ्यासक म्हणतात की साखर ही आरोग्यास हानि- कारक आहे यात अजिबात शंका नाही.कारण साखरेवर शुध्दीकरणाची सर्वात जास्त प्रक्रिया केली जाते.रिफाइंड साखरेला ‘एम्प्टी कॅलरी’ असं म्हणतात.प्रक्रिया व शुध्दीकरण केलेल्या साखरेत आरोग्यास लाभदायक गुणधर्म नसतात. उलट साखर अन्ननलिकेत गेल्याबरोबर त्याचं रुपांतर ग्लुकोज व फ्रुक्टोजम्धे होतं. ज्यांना अंगमेहनतीची कामं नसतात त्यांच्या शरीरात साखर चरबीच्या स्वरुपात जमा होते. याने मधुमेहाचा धोका वाढतो. तसेच साखरेमुळे यकृताला धोका निर्माण होतो.तसेच दात खराब होण्यास,कर्करोग होण्यासही ही रिफाइंड साखर जबाबदार ठरते.
●तांदूळ- प्रामुख्याने अनेकांच्या आहारात भात मोठ्या प्रमाणात असतो.जेवणात केवळ भातच हवा असं म्हणणारे आणि त्या नुसार आहार घेणारेही आहेत. पण अभ्यासक म्हणतात की, पांढर्या तांदुळावर पॉलिशची प्रक्रिया जास्त झालेली असते. त्यामुळे तांदळातील पोषक घटक नष्ट होतात.अभ्यासात अस