Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Ayurvedic Clinic, Allergist, Sexologist, straight from our business.

थाइरॉइड प्रॉब्लम – ॐ का उच्चारण करने से गले में वाइब्रेशन होता है। इससे थाइरॉइड प्रॉब्लम से बचाव…

थाइरॉइड प्रॉब्लम – ॐ का उच्चारण करने से गले में वाइब्रेशन होता है। इससे थाइरॉइड प्रॉब्लम से बचाव होता है। एंग्जायटी – ॐ का उच्चारण करने से स्ट्रेस और घबराहट जैसी प्रॉब्लम दूर होती हैं। स्ट्रेस और टेंशन – ॐ के जाप से मानसिक शांति मिलती है। चिंता और टेंशन दूर होती है। ब्लड सर्कुलेशन – जाप करने से बॉडी में ब्लड सर्कुलेशन बेहतर होता है। ब्लड में ऑक्सीजन बढ़ता है। हेल्दी हार्ट – रोज इस जाप को करने से लंग्स, बीपी, और ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव होता है। इससे हार्ट भी हेल्दी रहता है। डाइजेशन – ॐ का उच्चारण करने से पेट में वाइब्रेशन होता है। इससे डाइजेशन बेहतर होता है। एनर्जी – ॐ का उच्चारण करने से ज्यादा ऑक्सीजन मिलती है। ब्लड सर्कुलेशन अच्छा होता है। इससे एनर्जी बढ़ती है। थकान – ॐ का जाप करने से थकान दूर होती है। फ्रेशनेस महसूस होती है। अच्छी नींद – सोने से पहले ॐ का उच्चारण करने से नींद न आने की प्रॉब्लम दूर होती है। हेल्दी लंग्स – ॐ का उच्चारण लंग्स की कैपिसिटी बढ़ाता है। बॉडी को ज्यादा ऑक्सीजन मिलती है। स्ट्रांग स्पाइन – जाप से स्पाइनल कार्ड में भी वाइब्रेशन होता है। इससे रीढ़ की हड्डी स्ट्रांग होती है। एक्टिव माइंड – ॐ का उच्चारण करने से ब्रेन में वाइब्रेशन होता है। इससे कॉन्सट्रेशन बढ़ता है। माइंड एक्टिव होता है

Read full post

आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा म…

आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे. *मातीचे भांडेच का?* असं म्हटलं जात की मातीच्या तव्यावर पोळी बनवल्याने त्यामधील एकही पोषकतत्व नष्ट होत नाही. अॅल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने त्यातील ८७ टक्के पोषकतत्वे कमी हतोता. पितळेच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने ७ टक्के पोषकतत्वे कमी होतात. केवळ मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये १०० टक्के पोषकतत्वे कायम राहतात. *मातीच्या भांड्यात जेवण करणे सोईचे* मातीच्या भांड्यात वरण 25 मिनिटाच्या आत हळू आचेवर शिजून जात. म्हणून वरणाला नेहमी मातीच्या भांड्यात शिजवायला ठेवून तुम्ही तुमचे बाकीचे काम करू शकता. एक वेळा मातीच्या भांड्यातील शिजलेले वरण जर तुम्ही खाल्ले तर ते एवढे स्वादिष्ट आणि पौष्टिक असत की तुम्ही त्याची चव विसरू शकत नाही. याच प्रमाणे मातीच्या तव्यावर बनलेली पोळी व माठाचे पाणी फक्त स्वादिष्टच नसत तर ते जन्मभर तुम्हाला निरोगी बनवत. *स्वादिष्ट आणि पौष्टिक*

Read full post

*माती खाण्याचं व्यसन हानिकारक*

आपण सगळे जण मातीवर प्रेम करतो. मातीतून आपल्याला अन्न मिळतं. मातीपासून वेगवेगळ्या वस्तु तयार करतो. पण मातीतून नशाही येते असं म्हटलं तर? हो, हे खरं आहे. अलीकडे काही महिला, लहान मुलांना, तरुणवर्ग व वृद्धांना माती खाण्याचं व्यसन लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आज-काल नागरिक या मातीचं व्यसन करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. आज काल खाण्यासाठी मातीची मोठ्या प्रमाणात विक्रीही होत आहे. आर्श्चर्य म्हणजे ही माती चक्क दुकाणात मिळत आहे. *वैद्यकीय दृष्ट्या माती अधिक व दीर्घकाळ सेवनाचे दुष्परिणाम* मातीमध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक म्हणजे 21.25 टक्के आहे. सामान्यतः मानवी शरीरात कॅल्शियमचं प्रमाण 8.5 ते 10.2 मायक्रो ग्रॅम / पार्ट असते. ही माती प्रमाणापेक्षा अधिक सेवनाने व दीर्घकाळ सेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. अर्थात सेवन करणाऱ्याच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण प्रचंड वाढल्याने त्याचा किडनीवर दुष्परिणाम होऊन किडनीची कार्यक्षमता कमी होते. शिवाय तहान खूप लागते व परत परत लघवीला जावं लागतं. तसेच भुकेवर परिणाम होऊन पचनसंस्था बिघडते. अधिक कॅल्शियममुळे शरीरातील हाडांवर देखील परिणाम होऊ शकतो. कॅल्शियमचं प्रमाण वाढल्याने मेंदूवर परिणाम होऊन अनेकदा चक्कर येणे, थकवा जाणवणे, डिप्रेशन येणे तर हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन हृदयगती कमी जास्त होणे, हृदय गतीवरील नियंत्रण सुटणे असे धोकादायक प्रकार होऊ शकतात. एकंदरीतच कॅल्शियम अतिप्रमाणात सेवन करणे शरीराला हानिकारक ठरू शकतं.

Read full post

*हवी आहे फ्रोजन शोल्डर पासुन सुटका*

फ्रोजन शोल्डरचे दुखणे म्हणलं तर प्रत्येक घरात एक तरी असा आढळतो ज्याने हे दुखणे अनुभवले असते, प्रचंड वेदना व सतत वेदना असल्याने रोजची कामे देखील करता येत नाही. तसेच हे दुखणे फक्त खांद्याचे नसून त्यांत मानेच्या व पाठीच्या कांही मणक्यांत दोष असतो. मानेचे व पाठीचे वरचे पाच सहा मणके दबलेले चिकटलेले, एकावर एक चढलेले किंवा त्यांतील अंतर खूप कमी झालेले असते. कांही वेळा हाताच्या बोटांना मुंग्या येत असतात. अशा वेळेस आधुनिक वैद्यक तज्ज्ञ वेदनाशामक गोळ्या घ्यावयाचा सल्ला देतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण रोग पूर्णपणे बरा होत नाही. या तक्रारीकरिता आयुर्वेदाची अनेक औषधे, गुग्गुळ कल्प, अभ्यंग तेले, लेप गोळ्या बराच गुण देतात. उदा. सिंहनाद, लाक्षादि, गोक्षुरादि, त्रिफळा गुग्गुळ, वातगजांकुश इ. अशा तक्रारींनी पिडलेल्या रुग्णाने तत्काळ कोणतेही तेल म्हणजे गोडे तेल, तिळाचे तेल, एरंडेल चार भाग व गवती चहाचा अर्क एकत्र मिसळून सकाळी स्नानाचे अगोदर, रात्रौ झोपताना संबंधित हात, खांदा, मान यांना हलक्या हातांने जिरवावे. संपूर्ण हाताला खालून वर, खांदा व मान यांना गोल अशा पद्धतीने तेल चोळावे. एअर कंडिशनर, पंख्याचे थेट वारे, थंड पेये, आईस्क्रीम, लस्सी, बर्फ, लोणची पापड, खूप खारट, आंबट व थंड पदार्थ टाळावे. शक्यतो कठीण उबदार अंथरूण ब्लँकेट, गोधडी वापरावी. उशी, गादी टाळावी. जादा वजन उचलणे, एका हाताने पाण्याने भरलेली बादली उचलणे, तसेच खूप शारीरिक कष्टाची कामे टाळावी. कृश व्यक्तींनी खूप खूप लंघन न करिता माफक प्रमाणात उडीद, डिंक किंवा हाळीवाचे लाडू खावे. नेहमी शरीरातील रक्ताचे प्रमाणावर लक्ष असावे. कोणतेही शारीरिक काम घाईगर्दीने, हिसक

Read full post

*मोरिंगा पावडर म्हटलं की उत्तम आणि शेवग्याच्या पानांची पावडर म्हणलं की दुर्लक्ष,*

किती बदललो ना आपण भारतीय, इंग्रज आले ही आणि गेले ही परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आणखी ही गुलामी सोडली नाही, हेच आपलं दुर्भाग्य, शेवग्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आपण पूर्वी पासून आहारात उपयोग करत आलो आहोत आणि हो शेवग्याच्या पानांची पावडर ही आपले आज्जी आजोबा वापरायचे परंतु ते विसरून शेकडो रुपये खर्च करून मोरिंगा पावडर घरी आणून खाताना व्हिटॅमिन मिनरल्स चा विचार आपण हल्ली करत आहोत, परंतु आपण घरी देखील अशी पावडर बनवून आहारात वापरू शकतो ते ही अगदी केमिकल फ्री... " शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, खाण्यासाठी तर झाडाची साल डिंक मिळवण्यासाठी वापरतात. शेवग्याच्या झाडाच्या ताज्या हिरव्यागार पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, अॅन्टिऑक्सिडंट आणि अमिनो ॲसिड असतात. पाने वाळवून पावडर करून ठेवणे व आहारात वापरणे अधिक सोईचे आहे. वाळलेल्या पानांची पावडर वर्षभर टिकते. झाडांची ताजी हिरवीगार पाने तोडून स्वच्छ धुवावीत आणि उन्हामध्ये वाळवावीत. उन्हात वाळवताना त्याला संरक्षित पद्धतीमध्ये शक्यतो सोलार ड्रायरचा वापर करून वाळवावे म्हणजे त्यावर कचरा, धूळ, किडे अथवा इतर घाण बसणार नाही आणि स्वच्छ वाळलेली पाने मिळतील. तसेच वेळही वाचेल. वाळलेली पाने मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यावीत. ही पावडर भाजी, वरण, भाकरी, पराठे अथवा सुपमधून वापरता येईल. *पानाचे आरोग्यादायी फायदे* ■ लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे रक्तक्षय कमी होण्यास मदत होते. ■ हाडांना मजबुती येते. ■ मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर. शरीरातील दाह कमी होतो. ■ झिंकचे प्रमाण असल्यामुळे केस गळती

Read full post

सोबतचा व्हिडिओ बघून आयुर्वेद ग्रेट आहे याची प्रचिती येते.आयुर्वेद हे अतिप्राचीन शास्त्र आहे.आपल्य…

सोबतचा व्हिडिओ बघून आयुर्वेद ग्रेट आहे याची प्रचिती येते.आयुर्वेद हे अतिप्राचीन शास्त्र आहे.आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी दिव्य दृष्टीने प्रत्यक्ष आजाराचे निदान व त्याची चिकित्सा सांगितली आहे . आता यांत्रिकीकरणाचा युगात यंत्राद्वारे आपण ते काही प्रमाणात पडताळून पाहू शकतो.आणि आपसूकच आयुर्वेद चिकित्सा देऊन रुग्ण सेवा करीत असल्याचा अभिमान जागृत होतो. Colon हा मोठ्या आतड्याचा मुख्य भाग,तो सेकम पासून गुदाश यात जातो.जो मल उत्सर्जित होण्यापूर्वी अन्न अवशेषातून आद्रता काढतो. आयुर्वेदीय पंचकर्म उपक्रमातील बस्ती हा एक उपक्रम. बस्ती ही वात दोषासोबतच अन्य दोषांवरील श्रेष्ठ चिकित्सा.पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत जुनाट वा नवीन आजारांसाठी त्याच्या लक्षणानुसार, तीव्रतेनुसार आम्ही बरचसे वैद्य रुग्णांना बस्ती हा पंचकर्मातील उपक्रम प्रथम करावा लागेल असे सांगतो. बस्ती म्हणजे औषधी युक्त तैल,काढा गुद मार्गाने आत सोडणे.म्हणजे ऐनीमा सारखी प्रक्रिया पण ऐनीमा नव्हे,(ऐनीमा चा उपयोग मलनिरहरणासाठी होतो)तर बरेच रुग्ण म्हणतात अहो डॉक्टर आमचं पोट साफ होते.संडासला साफ होते.काही अडचण नाही.मग आम्ही त्यांना समजेल या भाषेत आपल्याला पोट साफ नाही करायचे तर पोटातले,धातू मधील दोष काढायचे आहेत .ते एका दिवसात नाही २१ वा ३३ दिवस सलग बस्ती घ्यावा लागेल.असे सांगतो, एनिमा मध्ये एका दिवसात पोट साफ होईल पण बस्ती मध्ये आपल्याला वर्षानुवर्षे मोठ्या आतड्यांमध्ये, धातू मध्ये चिकटून पडलेला,सडलेला मलभाग त्या त्या दोषासहित आतड्यांना इजा न करता बाहेर काढावा लागेल. सविस्तर माहिती आपण आपल्या जवळच्या वैद्याकडून घेऊ शकतो. जय आयुर्वेद.

Read full post

लेख २५

*थंडीत वाढणारा कफ दोष कसा टाळाल* आयुर्वेदाच्या सिद्धांताप्रमाणे थंडीच्या दिवसात शरीरात कफदोष साठतो . याचा अर्थ अन्न पचनानंतर कफदोषाची वाढ जास्त होते. कफदोष थंड आहे. तो जास्त बनू नये अशी योजना सतत चालू ठेवली पाहिजे. गोड पदार्थ व आंबट पदार्थ कफकारक असतात. ते नुसते न खाता त्यांच्याबरोबर, त्यांच्या आधी, त्यांच्या नंतर कफनाशक असे पदार्थ हळद, मेथी, तिखट आले, हिंग, लसूण वापरण्याचे भान सतत ठेवले पाहिजे. उन्हाळ्यात ओले सरपण सुद्धा जळते. तसेच उष्ण प्रकृतीच्या माणसांना पेरु, केळी, चिंचा, बोरे, आवळे, थंड पाणी, दूध, दही, ताक याची बाधा होत नाही. मात्र थंड प्रकृतीच्या लोकांना हे सगळे पदार्थ नुसते वर्ज्य करुन भागत नाही. तर ते कसे खावेत याच्या युक्त्या माहिती पाहिजेत. आले, सुंठ, ओवा, मिरे, लसूण, बिब्बा, हिंग याचा सतत उपयोग थंडीत युक्तीने चालू ठेवला पाहिजे. *या दिवसात दूध,दहि,साखर,ज्युस, केळी,चिकु,सिताफ़ळ, श्रीखंड,शिखरण करुन चालणार नाही*. तसे केल्यास सर्दीच्या त्रासातून थोरांची व मुलांची कधीच सुटका होणार नाही. असे पदार्थ खाणार असल्यास त्यात गरजेनुसार गूळ, हळद इ उष्ण पदार्थ घातले पाहिजे व आधी नंतर हिंगाष्टक चूर्ण,लवणभास्कर इ.औषधं खाण्यात असले पाहिजेत.

Read full post

🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋

म्हाळुंग..अर्थात गळलिंबू..... ========================== म्हाळुंग आजच्या पिढीने पाहिला आहे कि नाही हा एक मोठ्ठा प्रश्नच आहे .... लिंबू , संत्री ,मोसंबी अशा वर्गात महाळुंग हे पण एक अत्यंत रुचकर असे फळ आहे ... फळ साधारण पेरूच्या आकाराचे पण सातआठ पटीने मोठे असते ... फळाची साल बरीच जाड असते ... फळाचा मध्यभाग आंबट असतो ... गोड आणि आंबट अशा दोन जाती असून चवीनुसार गुणधर्मात बराच फरक पडतो ...आज अचानक आमच्या वैद्यांच्या समूहावर कुणीतरी हा विषय काढला आणि आमच्या आवडीचे हे फळ आमच्या वाचकांना उपलब्ध करून द्यायची इच्छा झाली ... म्हाळुंग एक औषध म्हणून उत्तम गुण देते ... १) आजारपणातून उठल्यावर तोंडाला चव नसेल तर म्हाळुंग सेवन करावे अत्यंत रुची उत्पन्न करणारे फळ आहे ... २) उचकी , दमा, जुनाट कोरडा खोकला यात म्हाळुंग सेवन करणे लाभदायक आहे ... म्हाळुंगाचे फळ नियमित खाल्ले कि बराच लाभ होतो ... ३) विंचू चावला असता म्हाळुंगाच्या बिया वाटून लेप लावलयास फायदा दिसतो ... ४) उलटी , मळमळ, तोंडाला पाणी सुटणे अशा लक्षणात म्हाळुंगाचे सेवन खूप लाभप्रद दिसते .... रोग्याला फळ खाल्ल्यावर तत्काळ आराम मिळून जातो ... ५) पोटात दुखत असेल तर , पोटात गोळा आल्यासारखे वाटत असेल तर म्हाळुंगाचे फळ सेवन लाभदायक आहे .... ६) ज्या स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही आणि पालीच्या वेळी फार कष्ट होतात त्यांच्यासाठी फळ आणि बिया यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा ... ७) अजीर्णामुळे पोटात दुखून त्रास होत असेल तर म्हाळुंगाचे सेवन अमृततुल्य आहे ... ८) म्हाळुंग हृदयाला बळ देणारा आहे त्यामुळे आजारामुळे हृदय कमकुवत झाले असेल तर फळाचे सेवन खूप लाभदायक आहे ... ९) म्हाळुंगाचे सेवन बुद्धी तल्लाख करते ... त्य

🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋 post imageRead full post

*कायम तारुण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ....*

1. रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे *9.30 ते 10.00* ला झोपणे. 2. सकाळी *5.00 -5.30* अगदी *उशिरा 6* बाजता किंवा त्याच्या आत उठणे. 3. गरजेनुसार तहान लागली की बसून पाणी पिणे 4. 10 मिनिटे *वज्रासनात* बसणे. 5. कमीत कमी फक्त *10 सूर्यनमस्कार* जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे. 5. फक्त *10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे* 6. रोज न चुकता एक *आवळा 7. *8.00-9.00 वाजता भरपूर नाष्टा* (या वेळेत जेवण केल्यास उत्तम) 8. 12.30 ते 1.30 ला थोडे *हलके जेवण.* 9. ऑफिस मध्ये दर *1 तासानी खुर्चीवरच हात पाय स्ट्रेचिंग करणे.* 10. संध्याकाळी *7 - 7.30 ला एकदम कमी जेवण.* 11. कंपल्सरी *15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे.* 12. 9 ते 9.30 वाजता आणि 9.30 ते जास्तीत जास्त10.00 ला झोप.* ★ *खबरदारी घ्या...* *रात्रीच्या जेवणानतंर चालायला जावे किंवा थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात.... *म्हणजे शंभर पावले चालणे....* लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून येतात रात्री.... ** *पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास, जेवताना मध्ये मध्ये अजिबात पाणी प्यावे * रोज गरजेनुसार पाणी प्यावे.* * फक्त *सिजनल* फळेच खावीत. * सर्वाना हात जोडून विंनती अशी कि, *कोल्डड्रिंक पिणे टाळावे, खूप वाईट आहे.* * दररोज *डाव्याकुशीवर* झोपावे.

Read full post

*ताण आणि तणाव :* ओम् उच्चारण केल्याने मानसिक शांतता मिळते. ताण आिण तणाव दूर होतो.

*रक्तप्रवाह :* ओम् उच्चारण केल्याने शरीरामध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो. रक्तामध्ये ऑक्सिजन वाढतो. *सुदृढ हृदय :* ओम् उच्चारण केल्याने फुप्फुस, रक्तदाब आणि रक्तप्रवाहात सुधारणा होते. यामुळे हृदय सुदृढ राहते. *पचन :* ओम् उच्चारण केल्याने पोटामध्ये कंपने निर्माण होतात. यामुळे पचन चांगले होते.

Read full post

*डोळयासमोर अंधारी*

चक्करयेण्या'पेक्षा वेगळा प्रकार म्हणजे डोळयापुढे अंधारी येऊन खाली पडणे किंवा जागच्या जागी बेशुध्द होणे. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा अचानक कमी पडणे. ही घटना अनेक कारणांमुळे घडते. 👉🏽 अतिरक्तदाब असताना अचानक उभे राहणे. 👉🏽 अल्परक्तदाब. यामुळे मेंदूत रक्तपुरवठा कमी होतो. 👉🏽 पोटातील चलनवलन एकदम (वायू, विकार, कळ) बदलून रक्तप्रवाहात घट येणे. 👉🏽 अतिवेदनेमुळे चेतासंस्थेवर तात्पुरता परिणाम होऊन त्यामुळे रक्तदाब अचानक कमी पडणे. यापैकी कारणे असतील तर उभी असलेली व्यक्ती खाली पडते. पण खाली पडल्यावर हृदय व मेंदू एकाच पातळीवर येऊन मेंदूचा रक्तप्रवाह लगेच सुधारतो. यामुळे ती व्यक्ती तात्पुरती बेशुध्दी संपून लगेच सावध होते. काहीवेळा अचानक खाली पडलेल्या व्यक्ती काही क्षणानंतर आपोआप सावध कशा होतात हे यातून समजते. अशी व्यक्ती *चक्कर येताना खाली पडत असल्यास तिला उभे धरून ठेवणे चुकीचे आहे.* कारण यामुळे मेंदूस रक्त पोहोचणार नाही. याऐवजी या व्यक्तीस हलकेच सुरक्षित आडवे होऊ देणे महत्त्वाचे आहे. हा महत्त्वाचा प्रथमोपचार आहे. काही आजारांमध्ये केवळ आडवे झाल्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्याची फारशी शक्यता नसते. 👉🏽 रक्तस्राव, 👉🏽 रक्तप्रवाह थांबणे, 👉🏽 मेंदूत रक्तस्राव होणे, 👉🏽 रक्तवाहिनी अरुंद होणे, 👉🏽 हृदयविकाराचा झटका, 👉🏽 शोष (शरीरातले पाणी कमी होणे), या आजारांमध्ये मेंदूचा रक्तपुरवठा कमी राहिल्याने ही स्थिती दीर्घकाळ राहते. इतर काही आजारांमुळे चक्कर येण्यासारखी भावना दिसते. खूप ताप,दृष्टिदोष, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे (उपास, मधुमेहात जादा इन्शुलिन दिल्याने किंवा इतर कारणाने), इत्यादीं

Read full post

*डायबिटीज मध्ये हे आसन नक्कीच तुम्हालाही फायदाच देतील.*

*1. कपालभाती प्राणायाम* कपालाभाती प्राणायाम आपल्या मज्जातंतू आणि मेंदूच्या नसाला ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम खूप चांगला आहे, कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. हा प्राणायाम रक्त परिसंचरण सुधारतो आणि मनाला शांती देतो. *2. सुप्त मत्स्येन्द्रासन:-* हे आसन शरीराच्या अंतर्गत अवयवांचे मालिश करते आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत करते . हे आसन ओटीपोटात अवयव सक्रिय करते. *3. धनुरासन* हे आसन स्वादुपिंड सक्रिय करते आणि मधुमेहाच्या रुग्णांना अत्यधिक फायदेशीर ठरतो. या योगासनाने ओटीपोटात अवयव बळकट होतात आणि पोटावरील तणाव कमी होतो. *4. पश्चिमोत्तानासन* हे आसन पोट आणि पेल्विक अवयवांना सक्रिय करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच शरीरात उर्जा वाढवते आणि मनाला शांती देते. *5. अर्धमत्स्येद्रासन* हे आसन ओटीपोटाच्या अवयवांचा मालिश करते आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. तसेच मणक्याला बळकट करते. हे योगासन केल्याने मन शांत होते, व पाठीच्या मक्यास सुरळीत रक्त पुरवठा होतो. *6. शवासन:-* शवासन संपूर्ण शरीर आराम देते. हे आसन एखाद्या व्यक्तीला खोल मन: स्थितीत घेऊन जाते, जेणेकरून मन शांत आणि नवीन उर्जेने परिपूर्ण होते. *7. सेतुबंधासन:-* मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही आसन खूप फायदेशीर आहे. हे केवळ ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवत नाही तर मनाला शांतता व विश्रांती देते. नियमित केल्याने पाचन तंत्र ठीक होते मान आणि मणक्याचे ताणण्याबरोबरच स्त्रिया मध्ये मासिकपाळीत आराम देत

Read full post