Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Ayurvedic Clinic, Allergist, Sexologist, straight from our business.

मधुमेहामुळे होणारे आजार

भारतातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे, ह्याचे मुख्य कारण म्हणजे असंतुलित जीवनशैली आणि आहाराचे बदलते समीकरण. मधुमेह किंवा डायबेटिसचे दोन प्रकार असतात, टाईप-१ आणि टाईप-२ डायबेटीस. टाईप-१ ह्या प्रकारमध्ये शरीरातील इन्सुलिन स्रवत नाही किंवा ते अत्यंत कमी प्रमाणात स्रवते, अश्या रुग्णांना इन्सुलिन घेतल्याशिवाय जगणे अवघड असते. टाईप-२ प्रकारामध्ये इन्सुलिन कमी प्रमाणात स्त्रवते, ह्या रुग्णांमध्ये मधुमेह योग्य औषध उपचारांनी नियंत्रित करता येतो. टाईप-२ हा प्रकार मुख्यतः असंतुलित आहार आणि जीवनशैलीमुळे होतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखर सतत वाढत असल्याने शरीरातील इतर अवयवांवर विपरीत परिणाम होऊन विविध आजार उद्भवतात. मधुमेहामुळे होणारे आजार- किडनीचे आजार- क्रोनिक किडनी फेल्युअरच्या कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे मधुमेह आहे, सामान्यतः किडनीमध्ये प्रत्येक मिनिटाला १२०० मिली रक्त प्रवाहित होऊन शुद्ध होते. आणि मधुमेह नियंत्रणात नसेल तर किडनी द्वारे प्रवाहित होणाऱ्या रक्ताचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढते ह्यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि हे किडनीसाठी नुकसानकारक असते असे दीर्घकालीन चालू राहिल्यास उच्चरक्तदाब वाढू शकतो आणि त्याने किडनीची कार्य करण्याची क्षमता अधिकच खालावू शकते उच्चरक्तदाब- उच्चरक्तदाब आणि मधुमेह- उच्चरक्तदाब आणि मधुमेह ह्यांना एकत्रितपणे अतितीव्र आजार म्हणून ओळखले जाते, अश्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. मधुमेहामुळे उच्चरक्तदाब होऊ नये ह्यासाठी गोड पदार्थ कमी खाणे, जीवनशैलीमध्ये बदल करणे, सकस पोषक आहार घेणे, वजनावर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. तसेच ह्या सर्वांचे असंतुलन झाल्यास उच्चरक्तदाबास

मधुमेहामुळे होणारे आजार post imageRead full post

ग्रीष्म ऋतुचर्या

AC मुले होणारे तोटे सतत ac मध्ये राहिल्याने शरीरामध्ये घाम निर्माण होणे कमी होते, व त्यामुळे शरीरातील असती धातूला दौर्बल्य प्राप्त होते, हाडे ठिसूळ बनतात. सततच्या AC मुळे त्वचेला रुक्षपणा प्राप्त होतो, थंड-गरम अश्या विरुद्ध टेम्परेचर मुळे रक्तदोष निर्माण होऊन त्वचा रोग होऊ शकतो. तसेच कफ दोष निर्माण होऊन सर्दीचे आजार होतात. त्याकरता उपाय म्हणजे दोन ते तीन तासांच्यावर ac चा वापर करू नये. तापमान अति थंड ठेवू नये, AC च्या अति वापराने मेधा वृद्धी होऊन स्थौल्य निर्माण होते. बंदिस्त जागेमध्ये कूलर चा अतिवापर निमोनिया व तत्सम टीबी सारखे आजार होऊ शकतात, त्याचबरोबर फॅन च्या देखील अतिवापरामुळे शरीरामध्ये वात वृद्धी होऊन हाडे ठिसूळ बनतात, शरीराला सूज येते, आलस्य, दौर्बल्य, तंद्रा, अग्नी मांद्य निर्माण होते. त्यामुळे फॅन चा गरजेपुरता वापर करावा. उन्हाळ्यात घ्यायचे द्रव पदार्थ- आमसूल सरबत आणि कोकम सरबत वाळा घातलेले माठातील थंडगार पाणि चिंचापानक कैरीचे पन्हे लिंबू सरबत तसेच तुळसबीज व सब्जा, धने, जिरे, कोथिंबीर, ताक. वरील पदार्थ बर्फ न टाकता घ्यावे. फळे- नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा द्राक्षे योग्य प्रमाणात काळे मनुके अंजीर सफरचंद अननस उष्णता वाढू नये म्हणून आहारीय पदार्थ, साळीच्या लाह्या, तुपातील शिरा, आमरस, गुलकंद, केशर+दूध, खीर-गावाच्या रव्याची खीर. धणे+जिरे पाणि (उकळले) पालेभाजी सूप कोहळा रस पेठा बर्फी इत्यादी पदार्थ व पेय आयुर्वेद प्रमाणे सांगितल्याप्रमाणे घेतल्याने आपण बर्याचश्या उन्हाळ्यातील आजारांपासून स्वतःचे राखसं करू शकतो. आयुर्वेदिक दिनचर्या, विशेषतः उन्हाळ्यातील आहार-विहारासंबंधी अधिक माहिती साठी आजच आमच्या क्लिनिक मध्ये संपर्क साधून अधिक माहिती जा

ग्रीष्म ऋतुचर्या post imageRead full post

त्यामुळे पोटात आम्ल खाली सरकण्याची प्रक्रिया मंदावते आणि आम्लपित्ताचा त्रास उद्भवतो.

आम्लपित्ताची लक्षणे: १. डोकेदुखी २. घशामध्ये जळजळणे ३. करपट आणि आंबट ढेकर ४. छातीत जळजळणे ५. जेवल्यावर पोट लगेच खूपच भरल्यासारखे वाटणे अम्लपित्तामुळे होणारे त्वचा विकार: १. अंगावर गळू येणे २. त्वचेवर तांबूस रंगाचे फोड येणे किंवा गांध्या येणे आणि आणि अंगाला तीव्र खाज सुटणे. उन्हाळ्यात होणारे त्वचा विकार- १. घामोळे २. नायटा ३. कांजण्या ४. त्वचा अधिक कोरडी पडणे आणि त्वचेला दाह पोहचणे ५. फंगल इन्फेक्शन तीव्र उन्ह आणि गरमीने अधिक घाम येत असतो अश्यात आपण नियमित घाम पुसणे आणि शरीर स्वछता राखणे हे आपले कर्तव्य आहे. घाम आणि अस्वचछतेमुळे आपण अनेक त्वचा रोगांना आमंत्रण देत असतो. ह्यासोबतच आपण आहार आणि दिनचर्या ह्याकडे पण विशेष लक्ष दिले पाहिजे अन्यथा आम्लपित्त, इतर पोटांचे विकार उद्भवणायची शक्यता असते. त्वचा विकार, आम्लपित्त आणि उन्हाळ्यातील आजार ह्यावर प्रभावी उपचार पद्धती म्हणजेच आयुर्वेद. आजच आमच्या क्लिनिक मध्ये संपर्क साधून, आपल्या आरोग्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

त्यामुळे पोटात आम्ल खाली सरकण्याची प्रक्रिया मंदावते आणि आम्लपित्ताचा त्रास उद्भवतो. post imageRead full post

उन्हाळ्यात वाढणारे आम्लपित्त आणि त्वचा विकार आणि आयुर्वेदीय दृष्टिकोन !

उन्हाळा, आम्लपित्त आणि त्वचा विकार हे समीकरण नेहमीच आपण ऐकत आलो आहोत. उन्हाळा चालू झाला कि पित्ताचा त्रास देखील बळावताना दिसतो, पण खरेतर आम्लपित्त आणि उन्हाळा ह्यांचा थेट असा काही संदर्भ बघायला मिळत नाही. मग उन्हाळा चालू झाला कि आम्लपित्ताचा त्रास का अधिक प्रमाणात बघायला मिळतो? अनेक रुग्णांच्या तक्रारींचे सूक्ष्म निरक्षण केल्यानंतर असे लक्षात आले कि उन्हाळ्यातील जीवनशैली आणि आहार-विहार हे प्रमुख कारणे आहे. प्रामुख्याने आपण उन्हाळा सुरु झाल्यावर आहारात अचानक बदल करतो, थंड आहार आणि पेय घेण्यावर आपला अधिक भर असतो कारण कडक उन्हाने आपल्या शरीराची लाही-लाही होत असते अश्याने आपण नको त्या आहाराचे सेवन करत असतो. उन्हाळ्यात एकतर पाणि कमी पिले जाते किंवा अत्यम्बु पान होते म्हणजे जास्त पाणी पिले जाते, असे केल्यास दोन्हीमुळे त्रास होतो. पाणि कमी पिले कि किडनी स्टोन, मुत्राशमरी, घामाचा दुर्गंध, उष्णताजन्य पिटिका, त्वचेला लाली, दाह होणे , लालसर चट्टे व गांधी उठणे, आम्लपित्त, भ्रम, चक्कर येणे, शिर शूल व डिहायड्रेशन होऊन रक्तदाब कमी होणे, थकवा आणि उष्मघात होऊ शकतो. पाणी जास्त पिले कि अग्निमांद्य, अजीर्ण उलट्या, जुलाब, शोथ सूज येणे थायरॉईड चा विकार, वजन वाढणे, मेदोवृद्धी व मधुमेह असे आजार होऊ शकतात. जेवढी तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे, द्रव आहार, फळे, लिंबू पाणी, ताक, पन्हे, सालीच्या लाह्या आणि नारळ पाणि ह्यांचा आहारात समावेश करावा. ह्यासोबतच उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि वाढत्या गर्मीमुळे आपण बाहेर जाणे टाळतो अश्याने शरीराच्या हालचाली कमी होतात आणि व्यायामाअभावी आपले शरीर असे जड पदार्थ लवकर पचवू शकत नाही

उन्हाळ्यात वाढणारे आम्लपित्त आणि त्वचा विकार आणि आयुर्वेदीय दृष्टिकोन ! post imageRead full post

केसांचे विकार आणि उपचार !

केसांचे आरोग्य व सौंदर्य ह्यांचे महत्व आपण जाणतो, ह्यामुळेच आपण सर्वजण मग ते महिला असो किंवा पुरुष सगळेच आपल्या केसांचे आरोग्य जपण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. आपण बाजारात मिळणारे अनेक केशतेल व शाम्पू आणि विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधने केसांसाठी वापरतो आणि तरी देखील केसांच्या समस्या उद्भवतात. केसांच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकतात, ह्याला असंतुलित आहार, प्रदूषण, केसांची अपुरी व अनियमित स्वच्छता, आणि केमिकल युक्त हेअर प्रॉडक्ट्स चा अतिवापर, अश्या बऱ्याच कारणांमुळे केसांचे आरोग्य धोक्यात येत असते. दैनंदिन जीवनात आपण केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जात असतो, ह्यामध्ये अधिक केस गळणे, तरुण वयात केस पांढरे होणे, केसांना फाटे फुटणे, अकाली टक्कल पडणे आणि केसात कोंडा होणे असे अनेक लक्षण आपल्याला दिसतात. केसांच्या सर्व विकारांवर आयुर्वेदिक उपचार पद्धती खूप उपयुक्त आहे, आयुर्वेदामध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी व केसांच्या विकारांवर विशिष्ट उपचार वर्णित केले आहेत. आम्ही श्री विश्वसुधा आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये केसांच्या सर्व समस्यांवर प्रभावी आयुर्वेदिक उपचार करतो. आजच आमच्याशी संपर्क करा ! संपर्क क्रमांक- 9881947290

केसांचे विकार आणि उपचार ! post imageRead full post

eBreath

eBreath One step solution to all types of Respiratory illness..... eBreath ( image) {Contents of eBreath } eBreath provides Nutritional supplement for people with COPD , Asthma , SARS CoV2, Tuberculosis, Cystic fibrosis, and other Respiratory disorders..... eBreath increases O2 carrying capacity in lungs and reduces production of diet induced CO2 and thus improves breathing and fight breathlessness. eBreath works by maintaining many tissues of body to prevent vitamin deficiency,produces antibodies an thus killing bacteria ,fungus, an other micro-organisms, relaxing muscles and nerves during distress. eBreath completes deficiency of essential vitamins,minerals and electrolytes in lungs. blocks damage caused by free radicals,thus heals wounds,slows down process that damage cells, maximizes nutrient delivery to muscle tissues...helping red blood cells to deliver oxygen in lung distress.It also lowers blood cholesterol and triglycerides and maintain proper balance of body fluids and body acid base balance...prevents cells against pre- oxidative damage. Action : Mucolytic : eBreath melts down cough accumulated, loosens mucus,making it easier to cough out...thus reduces congestion. Expectorant : eBreath decreases stickiness of airway secretions and helps in removal from airways, clears bronchial tubes and airway lumen and reduces cough and production of sputum, expels congestion and accelerates trachea mucus secretion. Bronchodilato

Read full post

For Reminder

*Syrup eBreath* Indications - # Dry and allergic cough # Decongestant # Laryngitis, Bronchitis # Asthma # Common cold,influenza Dosage - Child below 5 years 2 ml BD Children 5 to 10 years 5 ml BD Above 10 years 10 ml BD NO ANY CONTRAINDICATIONS *Syrup eBreath Plus* Indications - # Very effective in LRT # Bronchitis # Pneumonitis # COPD # Bronchitis # Tuberculosis # Lungs Fibrosis Dosage Above 3 years to 10 years 3.5 ml BD Above 10 years 10 ml BD CONTRAINDICATIONS Below 3 years child Pregnant women

Read full post

*जागतिक आरोग्य दिन*

*उत्तम आरोग्य म्हणजे नेमकं काय ?* जागतिक आरोग्य संघटना च्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी , आजार मुक्त शरीरच न्हवे तर शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्टया सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य. समजा एकादी व्यक्ती च शरीर व्याधी मुक्त आहे , त्याला कोणताही आजार नाही परंतु तो सतत कोणत्या न कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एकादा कायमस्वरूपी रागीट, आढळआपट करतो असतो, लालची किंवा लोभी असतात तर अश्याव्यक्ती ला निरोगी म्हणता येणार नाही. आपल्या जर अध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य जपायचं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्य सोबतच आपण मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तितकाच बर दिला पाहिजे तरच आपण एक मानव म्हणून समाजाचा उत्कर्ष करू शकू... *मानसिक आरोग्य* मानसिक स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती जिथं ताण , तणाव, चिंता , नकारात्मक विचारसरणी ला आपल्याला मनात स्थान नसेल . *भावनिक आरोग्य* भावनिक आरोग्य म्हणजे अशी संतुलीत स्थिती जिथं राग लोभ ,अहंकार व तिरस्कार ला आपल्याला जीवनात स्थान नसेल. *अध्यात्मिक आरोग्य* अध्यात्मिक आरोग्य म्हणजे एकात्मता आणि सुसंवाद ने राहणं म्हणजे च अध्यात्मिक आरोग्य. आपल्या स्वतःच्या धर्म आणि परंपरागत चालीतीरी वर विश्वास असणे व दुसऱ्यांच्या धर्म व परंपरा चा आदर करणे म्हणजे अध्यात्मिक आरोग्य व स्वास्थ. *शारीरिक आरोग्य* जेव्हा आपल शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधी पासून व शारीरिक इजे व अनियमितते पासून मुक्त असतो अश्या स्थितीस उत्तम शारीरिक आरोग्य म्हणून ओळखल् जात.

Read full post

*गुलकंदाचे हे ६ फायदे, आरोग्य आणि सौंदर्यही!*

उन्हाळा आला की ‘अन्न, वस्त्र, निवारा’ यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते, ती म्हणजे थंडावा! थंड गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. थोडक्यात काय, तर थंडावा मिळवण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते सगळे करायचे प्रयत्न सुरु असतात. या सगळ्या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ अनेकदा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे गुलकंद! गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या प्रेमात जसा गोडवा असतो, तसाच गोडवा गुलाब पाकळ्यांपासून बनलेल्या गुलकंदातही असतो. *१. थंडावा मिळण्यासाठी उत्तम पर्याय* शरीर थंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी गुलकंदात असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद खाणं कधीही चांगलंच ठरतं. कमी करण्याची क्षमता असणारे गुलकंद, थकवा, अंगदुखी, खाज अशा उन्हाळ्यातील त्रासांवर गुणकारी ठरते. याशिवाय अतिउष्णतेमुळे स्ट्रोकचा धोका संभवतो. अशावेळी गुलकंद सुद्धा कांद्याइतकंच गुणकारी ठरतं. चवीला उत्तम असल्याने, कांद्याचा पर्याय म्हणून गुलकंदाचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. *२. बद्धकोष्ठतेवर गुणकारी* हालचाल कमी झालेल्या हल्लीच्या जीवनात बद्धकोष्ठ हा सामान्य आजार होऊ लागला आहे. त्यातच वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे, ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडणे सुद्धा बंद झालंय. अशावेळी, गुलकंद खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोटातून बाहेर पडत असलेलं मल, फार घट्ट राहू नये यासाठी गुलकंद उपयोगी आहे. मल योग्य प्रमाणात नरम होण्यास आणि मलविसर्जन चांगल्यारितीने होण्यास गुलकंदाचे सेवन उपयोगी ठरते. *३. अल्सरवर गुणकारी* शरीरातील अति उष्णत

Read full post

*किती खावं प्रोटीन रोज?*

वजन कमी करायचं तर भरपूर प्रोटीन खा असं ऐकून तुम्हीही खूप प्रोटीन खाताय, उसळी- नॉनव्हेज-पनीर-सोयाबिन पण एवढं प्रोटीन खाणं खरंच फायद्याचं आहे की त्याचे दुष्परिणामच जास्त होत आहेत... वजनावर नियंत्रण मिळवणं हा फार पूर्वीपासून माणसाला असणारा जणू ध्यास आहे आणि असं असलं तरी स्थूलतेचं जगभर वाढणारं प्रमाण ही देखील सत्य परिस्थिती आहे. गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये वजन,स्थूलता, व्यायाम यांचं प्रस्थ खूपच वाढलं आणि मग देश विदेशात डाएटची असंख्य फॅड जन्माला आलीत आणि गेलीत! एक एक डाएट चर्चेत आलं की त्याची जणू जगभर लाट येते ! मग तेच डाएट कसं उत्तम आहे याचे दाखले- पुरावे दिले जातात. मग काही महिन्यांनी दुसरं काहीतरी येतं आणि पहिलं मागे पडतं असं वर्षानुर्वष घडत आलं आहे. मग त्यातूनच कार्बोहायड्रेट , प्रोटिन्स,फॅट्स असे शब्द वारंवार कानावर येऊ लागले. जिममध्ये जायचं, भरपूर व्यायाम करायचा, घाम गाळायचा आणि मग स्नायूंची ताकद आणि त्याचप्रमाणे आकार वाढलेला दिसावा म्हणून काहीतरी प्रोटीन पावडर किंवा इतर काही सप्लिमेण्ट यांचा आहारात समावेश करायचा असा एक ट्रेण्ड सुरु झाला. ‘काही आहारतज्ज्ञांचा या ट्रेण्डला विरोध आहे. त्यांच्यामते, कशाला हव्यात या महागड्या प्रोटीन पावडरी आणि सप्लिमेण्टस. आपली कडधान्यं काय कमी गुणकारी आहेत का !’ मग भरपूर प्रमाणात भिजवलेली कच्ची अथवा उकडलेली कडधान्यं खाल्ली जाऊ लागली! यात मग अगदी हिरव्या मुगापासून तर छोले, हरभरे, राजमा, वाटाणे या सगळ्यांचा समावेश झाला. पनीर, सोया मिल्क, सोया चंक्स हे ही त्यातून सुटले नाहीत. गहू दळून आणताना त्यात सोयाबीन दळले जाऊ लागले. हे इतकं वाढलं की लहान मुलांना देखील उत्तम वाढीसाठी प्

Read full post

*चला जाणून घेऊ गोमूत्राबद्दलच्या शंका-कुशंका*

आयुर्वेद के नुसार देशी गाईपासून मिळणारे गोमूत्र एक दिव्य व पवित्र मानले जाते यामध्ये औषधी गुणधर्म असतात जे मधुमेह, रक्तदाब, दमा, सोरायसिस, इसब, हृदयविकाराचा झटका, रक्तवाहिन्यांमधील अडथळा, फिट, कर्करोग, एड्स, मूळव्याध, संधिशोथ, मायग्रेन, थायरॉईड, व्रण, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, स्त्रीरोगविषयक समस्या, आशा अनेक रोगांमध्ये गोमूत्र फायदेशीर आहे. *दिवसभरात किती गोमूत्र पीने सुरक्षित आहे ?* उपाशी पोटी सकाळी व संध्याकाळी 10 ते 15 मिली लिटर गोमूत्र पिणे सुरक्षित आहे व हाच सामान्य डोस आहे.मात्र प्रत्येकाची सहनशीलता वेगळी असल्या कारणाने तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार गोमूत्राचे सेवन करा. *गोमूत्र हानिकारक आहे का?* नाही, गोमूत्र हानिकारक नाही आहे. परंतु असे म्हटले जाते की कुठलीही गोष्ट सामान्य मात्रा पेक्षा अधिक घेतली तर तिचे दुष्परिणाम दिसून येतात,असेच काहीसे गोमूत्राचे देखील आहे, म्हणूनच अशी शिफारस केली जाते की आपण आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्यानुसार गोमूत्र सेवन करू शकता परंतु जास्त गोमूत्र सेवन करू नये. *गोमूत्रामध्ये कोणते द्रव्य असतात?* इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्चनुसार गायीच्या मूत्रात सोडियम, लोह, मॅंगनीज, क्लोरीन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, टार्टरिक एसिड, कॅल्शियम, जीवनसत्त्वे (ए, बी, सी, डी, ई), दुग्धशर्करा, खनिजे, नायट्रोजन आणि क्रिएटिनिन असतात. *गोमूत्राचा वापर प्रेग्नेंसी असल्यावर केला जाऊ शकतो का?* नाही, गोमूत्राचा वापर गर्भधारणा झाल्यावर करू नये याने तुम्हाला अनेक समस्येचा सामना करावा लागेल, म्हणून आशा परिस्थितीत डॉ

Read full post