Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Ayurvedic Clinic, Allergist, Sexologist, straight from our business.

*पावसाळ्याच्या दिवसात सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खास उपाय*

लहान मुलं असो किंवा वयस्कर व्यक्ती असे बहुतांश लोकं साप या केवळ शब्दालाच घाबरतात. सापाच्या दंशाने नव्हे तर साप चावल्याच्या भीतीनेच काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. मुख्य म्हणजे सर्पदंश झाल्यावर वेळीच उपचार केल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आता पावसाळा जवळ आला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांत साप सर्वाधिक प्रमाणात दिसून येतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी शिरत असल्याने साप बिळाबाहेर येतात. बिळाबाहेर आल्यानंतर हे साप घरातही घुसतात. पावसाळ्यात सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी काही उपाय आम्ही सांगणार आहोत. 👉 सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही घरात कार्बोनिक अॅसिड आणि फिनाईल घरामध्ये शिंपडू शकता. साप यो दोन्ही प्रकारच्या अॅसिडला घाबरतात आणि घरामध्ये येत नाहीत. 👉 साप घरात येऊ नये म्हणून तुम्ही अजून एका मार्गाचा अवलंब करू शकता. यात तुम्ही अमोनियामध्ये कापडाचे तुकडे भिजवून ज्या ठिकाणाहून साप घरात प्रवेश करतो तिथे ठेवा. घरात पूर्वी कधी साप पाहिला असेल अशा ठिकाणीही तुम्ही हा कपडा ठेऊ शकता. 👉 सापाला दूर ठेवण्यासाठी केरोसिनचाही वापर केला जातो. रॉकेलमध्ये कापड भिजवून ते कापड घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा. तसंच घराच्या आजूबाजूला देखील तुम्ही रॉकेल शिंपडू शकता. रॉकेलचा वास सापांना सहन होत नसल्याने ते घरामध्ये येणार नाही

Read full post

*जीवनातील वेळ वाचत नाही तर वेळ कमी होतोय*

आजच्या काळात रेडी टू इट पदार्थ खाण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. यामुळे बनवण्याची मेहनत वाचते, तसेच गोष्टी लगेच उपलब्ध होतात. यामुळे बरेचसे लोक या पद्धतींचा वापर जास्त प्रमाणात करतात. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत लोक असे तयार पदार्थ खातात. बाजारात अनेक प्रकारचे पॅकेज केलेले फळांचे रस देखील उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत लोक चांगल्या आरोग्यासाठी फळांचे रस सेवन करतात. व्यस्त जीवनशैलीमुळे किंवा आळशीपणामुळे ताज्या फळांचे रस पिण्याऐवजी लोक पॅकेट ज्युस जास्त पितात. पण तुम्हाला माहित आहे का की पॅकबंद फळांचा रस सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते? अशा स्थितीत पॅकेज केलेला फळांचा रस पिण्याचे काय तोटे आहेत? हे जाणून घ्या आणि नंतर ठरावा त्याचे सेवन करायचे की नाही 📌 *मुलांसाठी हानिकारक* पॅक केलेले ज्यूस टिकवून ठेवण्यासाठी आणि तो जास्त काळ खराब होऊ नये म्हणून त्यात अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्याचे सेवन लहान मुलांसाठी खूप हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही मुलाला पॅकेज केलेले फळांचे रस सतत प्यायला देत असाल, तर त्याऐवजी फळे द्या. अन्यथा, तुमच्या मुलांना अन्नाची ऍलर्जी, त्वचेची ऍलर्जी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. *📌पोटाशी संबंधित आजार* पॅकेज केलेला फळांचा रस प्यायल्याने तुम्हाला अतिसार, बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित इतर अनेक आजारांचा धोका असतो. *📌मेंदूच्या समस्यांचा धोका* बाजारात उपलब्ध असलेल्या जवळपास सर्व पॅकेज केलेल्या फळांच्या रसांमध्ये ऑरगॅनिक्स, कॅडमियम आणि यांसारखी रसायने मिसळली

Read full post

*जांभूळ खाताना या चुका करु नका...*

जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधिवात आणि इतर अनेक पचन समस्या बरे करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पण अनेक वेळा असे घडते की आपण जांभूळ खाण्याच्या पद्धतींकडे जास्त लक्ष देत नाही. ज्यामुळे आपण आजारी पडतो किंवा आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. चला जाणून घेऊया जांभुळ खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. *- रिकाम्या पोटी जांभुळ खाणे टाळा* रिकाम्या पोटी जांभुळ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि यामुळे तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. जांभुळची चव आंबट असते, त्यामुळे रिकाम्या पोटी जांभुळ खाल्ल्याने अॅसिडीटी, पोटदुखी, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. *- जांभुळ आणि हळद एकत्र कधीही खाऊ नका* जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच हळदयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला जांभुळ खाल्ल्यानंतर हळद खाण्याची इच्छा असेल तर किमान 30 मिनिटे थांबा. वास्तविक, जांभुळ आणि हळद एकत्र मिसळल्याने शरीरात प्रतिक्रिया होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला बराच काळ अस्वस्थ वाटेल. तसेच यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. *- दूध आणि जांभुळ एकत्र खाल्ल्याने गॅस होतो* दूध आणि जांभुळ एकत्र सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. हे फळ खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर रहा आणि किमान 30 मिनिटांनंतरच दूध प्या. *- लोणचे आणि जांभुळ एकत्र खाऊ नका* घरी बनवलेले आंबट-गोड लोणचे खायला कोणाला आवडत नाही. पण इथे काही फ

Read full post

*मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदला…*

महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी या सवयी काढून टाकण्यावर आणि त्या सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते. *मासिक पाळीवर परिणाम करणाऱ्या वाईट सवयी* *खूप झोपणे* महिलांनी जास्त वेळ झोपू नये. आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास, तुमची मासिक पाळी देखील नियमित होईल. *वजनात बदल* अचानक वजनात फरक दिसून आला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते. *आहारात अडथळा* उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. जरी तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते. त्यामुळे सकस आहार खा. बाहेरील जंक फूड जास्त खाणे टाळा. ज्या पदार्थांत पोषक तत्वांचा समावेश असेल, असे पदार्थ खा. *गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेक*

Read full post

*हि पोस्ट एवढी शेअर करा कि, अवाढव्य पद्धतीने वापरात आणणाऱ्या पेनकिलर गोळ्याचा वापर थांबला पाहिजे.…

*हि पोस्ट एवढी शेअर करा कि, अवाढव्य पद्धतीने वापरात आणणाऱ्या पेनकिलर गोळ्याचा वापर थांबला पाहिजे...* *Pain Killer मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने थांबतात* वेदना होत असतील तर त्या टाळण्यासाठी आपण लगेच पेनकिलर घेतो. अनेकदा डॉक्टरही आपल्याला पेनकिलर घेण्याचा सल्ला देतात. पेनकिलर घेतल्याबरोबर वेदना त्वरित नाहीशा होतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, पेन किलरमध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने वेदना तातडीने नाहीशा होतात? मुळात, जेव्हा आपल्याला दुखापत होते, तेव्हा आपल्या शरीरातील सिग्नल थेट मेंदूला जातो, जो आपल्याला संदेश देतो की आपल्याला वेदना होतायत. ज्यामुळे आपल्याला वेदना जाणवते. मुख्य म्हणजे, वेदना होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यामुळे दुखापत झाली आहे किंवा आपल्याला काही धोका याचे संकेत देतात. *दुखापतीला कसं कमी करतात पेनकिलर औषधं?* पॅरासिटामॉल किंवा ब्रुफेन सारखी औषधं या वेदना एका खास पद्धतीने कमी करतात. जेव्हा आपल्याला दुखापत होते तेव्हा आपल्या शरीरात अशी अनेक रसायनं तयार होतात ज्यामुळे आपल्याला वेदना होतात. अशा परिस्थितीत, शरीर जखमी ठिकाणी अधिक रक्त पोहोचवू लागतं. *केमिकलमुळे वेदना आणि जळजळ होते* रक्तामध्ये पांढऱ्या रक्त पेशी देखील असतात ज्याचा उपयोग जखम बरा करण्यासाठी केला जातो. या पांढऱ्या रक्तपेशींसोबतच अनेक रसायनंही दुखापतीच्या ठिकाणी पोहोचतात. या प्रमुख रसायनांपैकी एकाचं नाव प्रोस्टॅग्लॅंडिंग आहे. या रसायनामुळे वेदना आणि जळजळ होते. *औषधं कशी काम करतात?* जेव्हा तुम्ही ही औषधं घेता तेव्हा ती हळूहळू तुमच्या

Read full post

*कित्तेक वर्षांपूर्वी वडाच्या झाडाचे महत्व सांगून ठेवले आहे, तरी देखील बऱ्याच लोकांना हे माहीत ना…

*कित्तेक वर्षांपूर्वी वडाच्या झाडाचे महत्व सांगून ठेवले आहे, तरी देखील बऱ्याच लोकांना हे माहीत नाही…* 🌳🌳🌳 वडाच्या फुलाचे,कोंबाचे,डहाळीचे,पानांचे फायदे आहेत. त्याने मनुष्याच्या आरोग्याला फायदा होतो… 🌳भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते. 🌳 वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात. 🌳 वडाच्या झाडामध्ये ढगातून पाऊस खेचून आणण्याची ताकद आहे असे म्हंटले जाते. जिथे वडाची झाडे जास्त तिथे पाऊस चांगला पडतो. 🌳 वडाचा आयुर्वेदिक उपचारासाठीही उपयोग होतो. वडाच्या पारंब्यांच्या रसाने केशवर्धन होते. पारंब्यांच्या काढा शक्तिवर्धक,बुद्धिवर्धक आहे. 🌳 गर्भधारणा होण्यासाठी आणि गर्भधारणा झाल्यानंतर वडाचा आयुर्वेद शास्त्राप्रमाणे औषधोपचार करता येतो. 🌳 गर्भधारणा झाल्यानंतर आधीच्या काळी बाळ सुदृढ असावे ह्यासाठी ठराविक नक्षत्रावर “हा विधी केला जायचा. वडाच्या कोवळ्या कोंबाला गायीच्या कच्च्या दुधात वाटून ठरावीक नक्षत्रावर, ठरावीक नासिकेत त्याचा रस आयुर्वेदाचार्यांकडून घेतला जायचा. 🌳 वडाच्या सालीचा काढा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत समस्येत उपयोगी ठरतो. 🌳 वड हा मुळात शीत असल्याने पित्तावर गुणकारी आहे. 🌳 उन्हाळ्यात त्वचाविकारांचा प्रादुर्भाव असतो. तेंव्हा वडाच्या झाडाच्या चिकाचा उपयोग होतो. 🌳 यकृताच्या समस्यांवर वडाच्या झाडाचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे. 🌳 वडाच्या शीतकारी गुणधर्मामुळे उन्हाळ्यात सर्वांसाठी उपयोगी असा हा वटवृक्ष. उन्ह्याळ्यात या वृक्षामुळे हवेत आद्रता सोडली जाते त्यामुळे याच्या छायेत गारवा मिळतो. अशाप्रकारे , अनन्य साधारण महत्व असलेले हे झाड ! *ज्याच्या घराजवळ असेल

Read full post

*देशी गाईचे तूप आहारात वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नाकात तूप सोडण्याचे अनेक फायदे आहेत. नाका…

*देशी गाईचे तूप आहारात वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नाकात तूप सोडण्याचे अनेक फायदे आहेत. नाकात देशी गाईचे शुद्ध तूप टाकून बऱ्याच आजारांपासून मुक्त होऊ शकतो. रात्री झोपताना देशी गाईच्या तुपाचे फक्त दोन थेंब नाकात टाकल्याने अनेक फायदे होतात. वात, पित्त, कफ या त्रिदोषांचा नाकात तूप टाकून समतोल साधता येतो. यासाठी गाईच्या तुपाचे दोन थेंब दिवसातून तीनवेळा नाकात टाका. गायीच्या तुपाचे काही थेंब नाकात घातल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाही.*

Read full post

*2 जुन - Dentist Day* 🦷👅

दातांचे आरोग्य फारच महत्त्वाचे असुन. मौखिक आरोग्य तुम्हांला एका निरोगी जीवनाकडे नेईल. (संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनामध्ये तोंडाच्या(मौखिक) आरोग्याचा फार मोठा वाटा आहे). आपले दात जागेवर धरून ठेवण्यासाठी हिरड्या त्यांच्या भोवती असतात. हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी, मुखाचे आरोग्य राखणार्‍या सवयींचा अवलंब करा. दररोज किमान दोनदा ब्रशने दांत स्वच्छ घासा, दररोज एकदा तरी दातांमधील फटी व्यवस्थित साफ करणे, आणि दातांच्या डॉक्टरकडे नियमितपणे जाण्याचे वेळापत्रक राखा. आपल्या हिरड्या लाल आणि सुजलेल्या असतील आणि त्यांमधून चटकन रक्त येत असेल तर त्यांना जंतुसंसर्ग झाला आहे असे समजा. त्वरित उपचाराने तोंडाचे आरोग्य पुन:श्चा मिळवा. उपचार न केल्यास खूपच गंभीर परिणाम होऊ शकतात. आणि दात पडू लागतात. *तोंडाच्या आरोग्यासाठी सर्वसाधारण सूचना* 👉🏽 नरम ब्रिसलचा ब्रश वापरा. 👉🏽 प्रत्येक जेवणानंतर खळखळून चुळा भरा. 👉🏽 अडकलेले अन्नकण काढण्यासाठी दात व्यवस्थित साफ करा. 👉🏽 तोंड कोरडे पडू लागल्यास लाळेचे प्रमाण वाढवण्यासाठी बिनसाखरेचे च्युइंगम चघळु शकता. 👉🏽 स्नायूंना व्यायाम घडविण्यासाठी कडक व दाणेदार पदार्थ खा. 👉🏽 मद्यार्कविरहित माउथवॉशचाच वापर करा कारण मद्यार्कयुक्त माउथवॉशने तोंड कोरडे पडते. 👉🏽 जीभ स्वच्छ‍ आहे ह्याची खात्री करण्यासाठी टंग क्ली्नर वापरा. 👉🏽 जिभेवर जीवाणूंचा थर जमल्यास हॅलिटोसिस सारखे रोग होऊ शकतात. टूथब्रशने देखील जीभ स्वच्छ करता येते. 👉🏽 पडून गेलेल्या दातांच्या ठिकाणी खोटे दात बसवावे (इंप्लांट्स) म्हणजे क्राउन्स आणि ब्रिजना आधार मिळतो व चेहर्याची एकंदर ठेवण चांगली दिसते. 👉🏽 दांत झिजले असल्यास, तुम्ही विविध

Read full post

*31 मे- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन* '

तंबाखूमुळे शरीरास किती अपाय होतात आणि किती जीवघेणे आजार आपल्याला विळखा घालतात हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. कर्करोग हा त्यातीलच एक आजार. तंबाखू हा आरोग्यास हानिकारक आहे, त्याचे व्यसन सोडा हा संदेश देणारा आजचा विशेष दिन म्हणजे 'वर्ल्ड नो टोबॅको डे'! तुम्ही सुद्धा हि माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहचवून समाजात जनजागृती करा आणि आपल्या ओळखीच्या लोकांना, मित्रमंडळींना ज्यांना तंबाखूचे व्यसन आहे त्यांना हे व्यसन सोडण्यास भाग पाडा. डॉक्टरांच्या मते तंबाखूच्या धुरा मध्ये ७००० केमिकल्स असतात ज्यापैकी ५० केमिकल्समुळे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही कोणा धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर हे केमिकल्स तुमच्या शरीरातही प्रवेश करतात आणि जास्त वेळ राहतात. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की एखादा व्यक्ती फुफ्फुसाच्या कर्करोगाने मेला पण त्याने कधीच व्यसन केलं नव्हतं, तर मंडळी त्याचा जीव याच पद्धतीने गेलेला असतो. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांपासून दूरच राहावे. आता तुम्ही म्हणाल की यापासून मी कसा वाचू किंवा स्वत:चा कसा बचाव करू? तर मंडळी जर तुम्ही शहरात राहत असाल तर अशा धुम्रपानापासून तुम्ही जास्त काळ स्वत:चा बचाव करू शकत नाही. कारण शहरात ठिकठिकाणी सिगारेट ओढत लोक फिरत असतात. यावर उपाय एकच तो म्हणजे जनजागृती होणे आणि लोकांनी स्वत:हून धुम्रपानाचे व्यसन सोडणे. पण फक्त याच दिवशी जनजागृती करावी असं नाही. हि जनजागृती वर्षाचे ३६५ दिवस झाली तरच फरक पडेल. ३१ मे हा दिवस फक्त लोकांना आठवण करून देण्यासाठी आहे की आपण अजूनही तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त झालेलो नाही. आपली लढाई अजून बाकी आहे. म

Read full post

*शरीराला टेकणाची सवय लावू नका...*

*स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम। विकारस्य धातू प्रशनं।।* *हे आयुर्वेदाचे ब्रीद आहे ।।* दिनचर्या - ऋतूचर्या - स्वस्थवृत्त आचार रसायन या ज्या गोष्टी आयुर्वेदात वर्णिला आहेत त्या आपलं आरोग्य टिकवण्यासाठी लाख मोलाच्या आहेत. एकदा का टेकनाची (support) सवय लागली की, व्यक्ती कमकुवत बनाय लागतो. स्वतःचे कौशल्य, गुणवत्ता विसरून त्या टेकनाच्या आधारावर विसंबून राहायला लागतो. भिकाऱ्याला गरजेपुर्ती भीक देऊन स्वावलंबनाचा मार्ग दाखवणं योग्य.. पण दररोजच भीक वाढलं, की त्याची ती नेहमीचीच सवय अन लाचारी होऊन बसते. आरोग्याचं, म्हनजे आपल्या शरिराचे ही तेच आहे. जेव्हा आपण शरीराद्वारे जे कार्य होते, ते बाहेरील औषधी देऊन, हार्मोन्स देऊन पुर्ण करू लागतो, तेव्हा त्या बाहेरील औषधींचा आधारावर त्या टेकणावर शरीर विसंबून राहायला लागत. पुढं पुढं तर त्याची विसंबून राहण्याची सवय एवढी बळावते की, साध्या सर्दी खोकल्याला पण प्रतिकार शरीर करू शकत नाही. ' कधी ते बाहेरील antibiotics चं औषधी येईल आणि त्याचा प्रतिकार करेल ' याची वाट पाहत बसते... मी असं बिल्कुल म्हणत नाही की, Antibiotics - हार्मोनल Theorapy वाईट आहेत ! त्या अति गरजेच्या वेळी पाहिजेच पाहिजे. पण त्यांच्या इतकं आहारी जाऊन आपली प्राकृत रोग प्रतिकार क्षमता गमावणे !! खुपच भयानक आहे... आयुर्वेदिक औषधी, पंचकर्म उपचार पद्धती, जीवनपद्धती हे डायरेक्ट आजाराशी कधीच लढत नाही, तर शरीरालाच त्या आजाराशी लढण्यासाठी शक्तिशाली बनवतात. त्या उच्चपातळी पर्यंत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, शरीराला आजाराशी लढायला तालमीतल्या पहिलवानासारखं तयार करत...

Read full post

*लघवीच्या कलर वरून ओळखू शकता आजार...*

शरीरात उद्भवणारे रोग किंवा समस्या लक्षणांवरून ओळखल्या जातात. तुमच्या त्वचेच्या आणि नखांच्या रंगावरून अनेक रोग ओळखले जातात. त्याचप्रमाणे तुमच्या लघवीचा रंगही तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक माहिती देऊ शकतो. शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांद्वारे काढून टाकणे हे मूत्राचे कार्य आहे. तुमच्या लघवीच्या रंगात कधी बदल झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. यासोबतच शरीरातील अनेक आजार ओळखण्यासाठी डॉक्टरांकडून लघवीची चाचणीही केली जाते. *1. हलका पिवळा लघवीचा रंग:-* जर तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा असेल, तर तुमचे शरीर व्यवस्थित काम करत आहे आणि तुम्ही निरोगी आहात. तसेच पुरेसे पाणी प्यायल्याने लघवीचा रंग हलका पिवळा होतो. *2. गडद पिवळा लघवीचा रंग:-* ज्या व्यक्तीच्या लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर ते शरीरात पाण्याची कमतरता दर्शवते. याचा अर्थ असा आहे की तुमचे शरीर निर्जलीकरण झाले आहे आणि तुम्हाला पुरेसे पाणी पिणे आणि द्रवपदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय काही वेळा औषधांच्या वापरामुळे लघवीचा रंग गडद पिवळा होतो. मात्र ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. *3. लाल किंवा गुलाबी लघवीचा रंग:-* गाजर, बीटरूट, बेरी इत्यादींच्या सेवनामुळे कधीकधी तुमच्या लघवीचा रंग लाल किंवा गुलाबी असू शकतो. पण अनेकदा ही समस्या कायम राहते, मग ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. मुळात, मूत्राचा लाल रंग त्यामध्ये रक्ताची उपस्थिती दर्शवतो. आणि यामागील कारण म्हणजे मूत्राशय किंवा मूत्रपिंडात ट्यूमर स्टोन किंवा वाढलेली प्रोस्टेट असू शकते. *

Read full post

*तेलाच्या गुळण्या केल्याने जबरदस्त फायदे*

सकाळी उठल्यानंतर तोंड धुणं, दात घासणं हा सगळ्यांचा नित्यक्रम असतो. पण काहीजण सकाळी दात घासल्यानंतर तोंडात नारळाच्या तेलाची गुळणी धरतात. हा कुठला उपाय म्हणत अशा उपायाची खिल्ली उडवणारेही खूप आहेत. तेलाची गुळणी करणं हा प्राचीन उपाय आहे. यालाच माॅर्डन सवयीच्या भाषेत ऑइल पुलिंग असंही म्हणतात. दात स्वच्छ घासल्यानंतरही तेलाची गुळणी करुन काय मिळतं? तेलाची गुळणी कशी करावी? कोणतं तेल वापरावं? असे अनेक प्रश्न तेलाच्या गुळणीसंदर्भार्त निर्माण होतात. तज्ज्ञ म्हणतात केवळ तोंडाच्या आतील स्वच्छता, मुख आरोग्य यासाठीच नाही तर फिटनेस राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तेलाची गुळणी केल्याने फायदे होतात. तेलाची गुळणी करण्याचा उपाय आपल्या दिनचर्येत सामील करायचा असल्यास गुळणी करण्यासाठी नारळाचं तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. *तेलाची गुळणी कशी करावी?* तेलाची गुळणी करण्यासाठी शुध्द, नैसर्गिक स्वरुपातलं, घाणीचं किंवा आयुर्वेद दुकानात मिळणारं नारळाचं तेल वापरावं. एक चमचा नारळाचं तेल घ्यावं. ते घट्ट असल्यास गरम करुन पातळ करावं. ते सामान्य तापमानाला आलं की 1 चमचा तेल तोंडात टाकावं. तोंड बंद करुन तेल संपूर्ण तोंडात फिरवावं. तेल तोंडात फिरवताना हळू फिरवाव. ते गिळू नये. एक मिनिटानंतर गुळणी बाहेर टाकावी. तेलाची गुळणीची सवय लावताना सुरुवातीला केवळ एक मिनीट गुळणी धरावी आणि मग हा वेळ पुढे 10-15 मिनिटापर्यंत वाढवता येतो. तेलाची गुळणी दिवसभरात कधीही करुन चालत नाही. ती सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करावी असं तज्ज्ञ सांगतात. *गुळण्यांसाठी नारळाचंच तेल का?* सूर्यफूल, ऑलिव्ह ऑइलयापेक्षाही नारळाचं तेल गुळण्यांसा

Read full post