Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Ayurvedic Clinic, Allergist, Sexologist, straight from our business.

मधुमेहासाठी योग आणि त्याबद्दल शंका

वारंवार विचारले जाणारे प्रश्न 1. मधुमेहासाठी मी दररोज योगासने करावीत का? तुमच्या मधुमेह व्यवस्थापनाच्या प्रवासात दररोज योगासने करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. फक्त खात्री करा की तुम्ही संबंधित पोझ करत आहात जे तुमच्या आरोग्याला समर्थन देतील आणि अनुकूल करतील, तुमच्यासाठी गोष्टी आणखी वाईट करण्याऐवजी. 2. गुडघेदुखीसह मी योगा करू शकतो का? जर तुम्हाला गुडघेदुखी होत असेल तर गुडघ्यांवर दबाव आणणारी योगासने टाळा कारण त्यामुळे तुमचा आजार वाढू शकतो. 3. मला मधुमेहासाठी योगा करण्यासाठी प्रशिक्षकाची गरज आहे का? तुम्‍ही योगा करण्‍यासाठी पूर्णपणे नवीन असल्‍यास आणि योगाच्‍या विविध आसनांबद्दल तुम्‍हाला फारशी कल्पना नसेल, तर तुम्‍ही तुम्‍ही प्रशिक्षकासोबत तुमचा प्रवास सुरू करण्‍याची शिफारस करतो. मधुमेहासाठी योग मधुमेहाच्या रुग्णांना मदत करणाऱ्या सोप्प्या योगासनांची यादी आणि त्यांचे महत्त्व. ही योगासने नियमितपणे केल्यास मधुमेहाच्या रुग्णांना फार मदत होते. जास्त मेहनत न घेता करता येणारी ही आसने आहेत. १.कपालभाती प्राणायाम कपालभाती प्राणायाम आपल्या मज्जासंस्था आणि मेंदूच्या मज्जातंतूंना ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे प्राणायाम महत्त्वाचे आहे कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. प्राणायामने मनाला शांती मिळते. २. सुप्त मत्स्येन्द्रसन सुप्त मत्सेंद्रयासन अन्न पचन करण्यास मदत करते. हे आसन मधुमेह रूग्णांसाठी खूप चांगले आहे. ३. धनुरासन या आसनामुळे स्वादुपिंड सक्रिय होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांना अत्यधिक फायदेशीर ठरते. ४. पश्चिमोत्नासन हे आसन ओटीपोटातील अवयवांना सक्रिय करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. पश्चिमोत्नासन शर

Read full post

सोनं म्हटल की आपल्या डोळ्यासमोर सहजच तांबूस रंगाची वलय संपत्तीच्या भूरसट कल्पकतेतून जन्मास येते.म…

सोनं म्हटल की आपल्या डोळ्यासमोर सहजच तांबूस रंगाची वलय संपत्तीच्या भूरसट कल्पकतेतून जन्मास येते.मात्र या व्यतिरिक्त जगात अपरिमित अशा सोन्याची अनेक रूपे आहेत.निसर्गातल्या अशा अनाकलनीय सुवर्णतुल्य गोष्टींशी आपण अनभिज्ञ असतो.अशीच काहीशी सोन्याला लाजवेल अशी गुणात्मकता घेवून जंगलांमध्ये काहीवेळा रस्त्यांच्या कडेने, एक वेलवर्गीय वनस्पती झाडाझुडपांच्या सोबतीने वाढते.ती म्हणजे गुंज ! बऱ्याच जणांना अगदी लहानपणी या गुंजावळ्यांचा संचय करायची कदाचित हौस देखील असावी.मात्र या लाल - काळया रंगाच्या बिया कुणी पाहिल्या नसतील अस क्वचितच असेल.फार पूर्वीपासून आपल्या दैनंदिन व्यवहारात या बिया वापरल्या जायच्या.त्या इतक्या अमूल्य होत्या की पूर्वी सोने मोजायला त्यांचा उपयोग केला जाई.ढोबळमानाने का होईना पण , एखाद्या वनस्पतीच्या बीजाला त्या काळी सुवर्णतुल्य समजल जात होतं.साधारण पावसाळ्यात या जमिनीत पडलेल्या बियांमधून अंकुरित होवून २ महिन्यांच्या अवधीत,छोट्या - छोट्या पानांच्या गर्दीतून हा वेल वाढत जातो.हिरव्या झूडपांच्या सोबतीने या वेलींचा चमू विस्तारतो अन् फिकट जांभाळट गुलाबी फुलांच्या तुऱ्यांमधून ही वेल शाकारते. विलोभनीय पुष्पसंभार मावळत असतानाच फुलांच्या खालच्या बाजूला हिरव्या शेंगा लगडलेल्या दिसतात.शेंगांच्या आत ७-८ बिया तयार होतात.मात्र परिपक्व झाल्याशिवाय त्या कुणाला दिसत नाहीत.प्रखर उन्हाच्या तडाख्याने सुलाखून निघालेल्या शेंगा आपल्या अंतरंगातला हा तप्त खजिना दर्शनासाठी खुला करतात. छोट्या-छोट्या लालेलाल बियांना मध्येच काळया रंगाचा एक बिंदू अधोरेखित करतो अन् अशा ४-५ खुललेल्या सुक्या शेंगांच्या सालींमध्ये बियांचे कुंचले विखुरले जातात.

Read full post

मधुमेहाने त्रस्त आहात ?

शुगर नियंत्रित करण्याचा उपायच सापडत नाहीये ना ? काळजी करू नका ! डॉ. पंकज इंगवले यांचे श्रीविश्वसुधा आयुर्वेद केंद्रात मधुमेहावर हमखास नियंत्रण मिळवणाऱ्या रामबाण उपचार पद्धती आमलात आणल्या जातात. गेल्या १५ वर्षात डॉ. पंकज इंगवले यांनी ४०० पेक्षा अधिक मधुमेह रुग्णांना मधुमेह उपद्रवातून बाहेर काढयणात आणि आनंदी जीवन जगण्यात मदत केली आहे. तेव्हा वाट कसली बघताय ? मधुमेहासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास आजच संपर्क करा : ९८८१९४७२९० पत्ता : ऑफिस क्रमांक ११६, पहिला मजला, साऊथ ब्लॉक बी, फॉर्चुन इस्टेट, जेम्स बजाज शोरूम नजीक, आकाशवाणी हडपसर, पुणे, महाराष्ट्र, ४११०२८ डॉ. पंकज इंगवले यांचे श्रीविश्वसुधा आयुर्वेद केंद्राची वैशिष्ट्ये : ⋆ १५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ वैद्य ⋆ ४०० पेक्षा अधिक मधुमेह रुग्णांना मधुमेह उपद्रवातून बाहेर काढयणात यश ⋆ नैसर्गिक उपचार ⋆ साधी आणि सोपी उपचार पद्धत ⋆ आहारासंबंधी मार्गदर्शन ⋆ योग्य आणि व्यायाम यांचा उत्तम मेळ साधून शुगर नियंत्रणास मदत ⋆ पंचकर्म सल्ला आणि उपचार ⋆ पूर्व मधुमेही रुग्णांवर देखील उपचार ⋆ कोणत्याही भूल थापा नाहीत ⋆ खोटी वचनबद्धता नाही

मधुमेहाने त्रस्त आहात ? post imageRead full post

हिंदू संस्कार संस्कृतीतील कोहळा फळभाजी विषयी जनमानसात अनेक समज व गैरसमज आहेत.त्यामुळे कोहळ्याच्या…

हिंदू संस्कार संस्कृतीतील कोहळा फळभाजी विषयी जनमानसात अनेक समज व गैरसमज आहेत.त्यामुळे कोहळ्याच्या भाजीचा पूरक वापर होताना दिसून येत नाही वा आढळत नाही. "मुख्य दरवाजासमोर कोहळा बांधणे ही अंधश्रद्धा समजली जाते," हा बौद्धिक कृतीच्या आकलन क्षमतेचा अनन्यसाधारण अविभाज्य भाग आहे. परंतु वास्तव आजमावण्यासाठी कोणीही त्याच्या मुळापर्यंत न जाता केवळ टीका करून दुर्लक्षित करण्याचे गैरकृत्य मात्र इमान इतबारे करतो. व आपणच उच्चविद्याविभूषित वैज्ञानिक असल्याचा आव आणत निर्वाळा देण्याचे गैरकृत्य करतो. हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेचा व आकलनाचा भाग आहे! असो. १) काळे केस पांढरे करण्यासाठी:- कोहळा या फळभाजीवरील पांढरी लव खरडून ती केसांच्या मुळांना लावल्यास केस लवकरच पांढरे होतात. २) हृदयविकार कमी करण्यासाठी:- कोहळ्याची भाजी अष्टमी, पौर्णिमा,अमावस्या,चतुर्दशी या तिथींना सेवन केल्यास, कोहळ्यातील पोटॅशियम मुळे हृदयाची सूज कमी होते,तसेच अनेक हृदयविकारांना पूर्णविराम मिळतो. म्हणूनच वैकुंठचतुर्दशीला कोहळा हा वास्तुपुरुषाला बळी देऊन त्याची भाजी करण्याची प्रथा परंपरा सनातन संस्कृतीमध्ये आढळून येते.

Read full post

उंबर किंवा औदुंबर या नावाने ओळखला जाणारा वृक्ष याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, औद…

उंबर किंवा औदुंबर या नावाने ओळखला जाणारा वृक्ष याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, औदुंबर . उंबराचे झाड खूप मोठे असते. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते.या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात. या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. शिवाय हे २४ तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल. उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. उंबरात किडे असतात. (उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला! जग हे बंदीशाला ... राजा परांजपे यांच्या 'जगाच्या पाठीवर' चित्रपटातले गीत) धार्मिक महत्त्व या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पूजा केली जाते. औषधी उपयोग या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. उंबराची फळे खाता येतात. याची पाने शेळी बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात. अशा या पूजनीय बहुउपयोगी झाडाचा बीजप्रसार पक्ष्यांमार्फत होतो.

Read full post

अनंतमूल सारिवा या शारदा

◆गुरु और स्निग्ध(पित्त वात हर) है । ◆मधुर और तिक्त(पित्त,वात,कफ हर), ◆शीत वीर्य ,मधुर विपाक है,अतः यह काम करती है अनंत बीमारियों पर। ◆हरती है वात,पित्त, कफ तीनो दोषों को। ◆रस, रक्त,मेद, शुक्र धातु पर अच्छा कार्य। ◆अतिसार में कार्य,मूत्रल,स्वेद जनन,गर्भाशय पर कार्य 1.पाचन संस्थान पर कार्य:- रोचन,दीपन,पाचन,अनुलोमन,स्तंभन। 2.रक्त वह संस्थान:- रक्तशोधक,शोथहर,सोरायसिस,एक्जिमा,चर्म रोग,रक्त पित्त,वात रक्त,फिरंग,एक्ने,गलगंड। 3.श्वसन संस्थान:-कफघ्न,श्वास,haemoptysis, फेफड़ों की ijnury। 4.स्त्री रोग:-गर्भाशय शोधक,पोषक,गर्भ स्थापक,स्तन्य शोधक,गर्भाशय की अम्लता हरती है,Habitual abortion,गोरा बच्चा देती है। 5.पुरुष रोग:-शुक्र शोधक,शुक्र स्तंभक,शुक्र पोषक,premature ejaculation, erectile डिसफंक्शन,गुस्सा कम करती है। 6.मूत्र वह संस्थान:-मूत्र साद,मूत्र संग,मूत्र कृच्छ,कामला,किडनी फंक्शन को बिना वृक्क को क्षति पहुंछाए बढ़ाती है,पित्तज प्रमेहः में मूत्र के रंग को साफ करती है। 7.त्वक विकार:-त्वचा की समस्त व्याधि,खुजली,जलन,रक्त शोधक,व्रण,एक्ने,सोरायसिस। 8.शरीर के तापमान पर प्रभाव:-शरीर मे गर्मी,जलन,ज्वरः,संक्रमण,विषहर प्रयोग विधि:- 1.जड़ का पाउडर 3-6 gm. प्रतिदिन 2 बार भोजन के बाद। 2.रात को 1चम्मच पाउडर भिगोकर सुबह इसका पानी छानकर पी सकते हैं।

Read full post

✍️केस गळती प्रामुख्याने हिवाळ्यात दिसत असेल तर त्याचे कारण हे पावसाळ्यात शरीरीत तयार झाले असते.

✍️ऋतूनुसार पावसाळ्यात वात दोषाचा संचय व प्रकोप होतो.ज्याचे दुष्परिणाम पुढील ऋतुत भोगावे लागतात. ✍️वात दोषाचे काम हे सुदृठपणे अस्थिंचे पोषण करणे. हे पोषण जर निट झाले नाही तर हाडांच्या झिजेचे प्रमाण वाढते. वाताचे विकार याच काळात जोर पकडतात. ✍️ सप्तधातुतील अस्थी या धातुचा मल म्हणजे केश. धातु उत्तम असेल तर मल कमी तयार होतो. मलाचीही गुणवत्ता उत्तम असते. जसे मेथीची जुडी विकत आणल्यावर ती निवडताना जूडी जेवढी ताजी तेवढाच जुडीतील निघणारा टाकाऊ भाग कमी शिवाय तोही खराब नाही. याप्रमाणेच हाडांच्या आरोग्याशी केसांचे आरोग्य अबलंबुन आहे. ✍️वाताची योग्य चिकित्सा हीच केसांची चिकित्सा. वैद्याकडून नाडी व पचन तपासणी करायला हवी. त्यानुसार वैद्य पोटातुन पाचक व बृंहण औषधी देतात. ✍️केस हा अस्थीचा मल आहे. केसांच्या मुळांना सतत हवा व उन्ह लागत राहले तर मुळांशी असलेल्या तैलग्रंथीच्या कार्यावर परिणाम होती व केसांमधे कोरडेपणा येतो म्हणून केस मोकळे सोडण्या ऐवजी बांधुन ठेवावे. डोक्यावर पदर वा स्कार्फ वा टोपी वापरावे. ✍️ बाह्य उपचारासाठी केस ताकाने, शेतातील चार वित खोल काळ्या मातीने मेंदीसारखा लेप करुन धुवावे. कढीपत्ता व चहा पावडर यांच्या काढ्याने केस धुणे. शिकेकाई व वाळा यांच्या काढ्याने केस धुणे.शिवाय आजाराच्या कारणानुसार अनेक बाह्य उपचार असतात. ✍️शाम्पू पंधरा दिवस वा महिन्यात एकदाच वापरावा. ✍️केसांना धुर्धूरपत्रादी तैल, निलीभृंग्यादी तैल, महाभृंगराज तैल, आमला आॅईल तैलाने नियमित लावणे. पंचकर्म सेंटरमधे यासाठी शिरोबस्ती उपचार उपलब्ध असतात.

Read full post

काही निकषांवरून कोणाला प्रकार एकचा मधुमेह(type -1) होण्याची शक्यता आहे हे शोधणे आता शक्य झाले आहे…

काही निकषांवरून कोणाला प्रकार एकचा मधुमेह(type -1) होण्याची शक्यता आहे हे शोधणे आता शक्य झाले आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह झाल्याचे अलीकडेच निदान झाले आहे अशा रुग्णाच्या भावंडांना मधुमेह होण्याची (त्यांच्यात स्वयं प्रतिपिंड असण्याची - ऑटो अँटीबॉडीज) जास्त शक्यता असते. रक्ताच्या एका चाचणीवरून हे कळू शकते. ज्यांच्या रक्ततपासणीत अशी प्रतिपिंडे सापडतात त्यांना काही महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंत पहिल्या प्रकारचा मधुमेह होऊ शकतो. होकारार्थी चाचणी आलेल्या व्यक्तीवर उपाय करून भविष्यात होणारा मधुमेह टाळण्यात माफक यश आले आहे. निकोटीनामाइड, मधुमेहावरील लसी, अत्यल्प प्रमाणात इन्शुलिनचा वापर, इत्यादी प्रयोगांना मर्यादित यश आले आहे. या दिशेने आणखी संशोधन पुढे चालू आहे. ज्यांना पहिल्या प्रकारचा मधुमेह असल्याचे आधीच निदान झाले आहे अशांची त्यापासून सुटका होण्याच्या दृष्टीने उत्साहवर्धक प्रगती झाली आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह असल्याचे निदान झाल्याबरोबर चार आठवड्यांच्या आत जर इम्युनोसप्रेसिव्ह (प्रतिक्षमता दमनकारी) गोळ्या लवकरात लवकर सुरू केल्या तर अनेक रुग्णांची या मधुमेहापासून सुटका होणे (रुग्ण पूर्वस्थितीला येणे) शक्य असते. त्यांतील काही जणांना इन्शुलिन न देताही त्यांच्या रक्तातील साखरेवर एक वर्षाहून अधिक काळ नियंत्रण मिळवता येते. अनेक प्रकारच्या इम्युनोसप्रेसिव्ह गोळ्यांपैकी सायक्लोस्पोरीन या औषधाचे परिणाम सर्वांत उत्तम असल्याचे आढळून आले आहे आणि इतर इम्युनोसप्रेसन्ट औषधांशी त्याचा योग्य मेळ घालून त्याच्यात आणखी सुधारणा करता येऊ शकते. तथापि, ही औषधे अत्यंत महाग असून दीर्घकाळ वापर केल्यास त्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

काही निकषांवरून कोणाला प्रकार एकचा मधुमेह(type -1) होण्याची शक्यता आहे हे शोधणे आता शक्य झाले आहे… post imageRead full post

जागतिक मधुमेह दिन

मधुमेह ही व्याधी आज सर्वांच्या परिचयाची झाली असून; या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष असे, ६० व्या वर्षांच्या सरासरी आयुर्मानात पडणाऱ्या या आजाराचा विळखा आता तिशीतच पडू लागला आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढते असल्याने १० लाख व्यक्तींची मधुमेह चाचणी एका दिवसात करण्यात आली. यात ९ टक्के लोकं मधुमेह या आजाराच्या विळख्यात अडकले असून त्यांना याची माहितीच नसल्याचे चाचणीतून उघड झाले. एका दिवसाच्या तपासणी मोहिमेतून ९६ हजार व्यक्तींना मधुमेह असल्याचे निदान झाले. मधुमेह हा वेळीच ओळखून त्यावर योग्य वेळी उपाय केले की नक्कीच मधुमेहपासून सुटका होऊ शकते किंवा शरीराच्या इतर अवयवांना निर्माण होणारा धोखा टळू शकतो...

जागतिक मधुमेह दिन post imageRead full post

पाणी आणि आपले आरोग्य

पाणी म्हणजे जीवन मानलं जातं. शरीराला अत्यंत आवश्यक असा हा घटक आहे. मात्र गरज नसताना पाणी प्यायल्यामुळे किंवा चुकीच्या वेळेस पाणी प्यायल्याने त्याचा उपयोग होण्याऐवजी दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच पाणी पिताना काही गोष्टींची, विशेषत: पाणी कधी पिऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. निरोगी जीवनासाठी योग्य आहारविहाराच्या बरोबरीने, योग्य प्रमाणात पाणी पिणंही आवश्यक असतं. मात्र बरेचजण एक चूक अगदी सर्रास करताना दिसतात आणि ती म्हणजे, अमूक लिटर, अमूक इतके ग्लास पाणी दिवसभरात संपवलंच पाहिजे हा विचित्र नियम पाळणं. शिवाय हा नियम पाळताना चुकीच्या वेळात पाणी पितच रहाणं सुद्धा अपायकारक आहे. पाणी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेच. मात्र ते पिताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. किती पाणी प्यावं याचबरोबर ते कधी प्यावं हेदेखील लक्षात घ्यायला हवं. आपलं शरीर म्हणजे एक चमत्कारिक यंत्रच आहे. त्याच्या गरजा ते योग्यवेळी व्यक्त करतं आणि तितकीच ती भागवतंही. भूक लागल्याशिवाय जेवू नये आणि तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये. अनेकजण उगाचंच तहान लागलेली नसली तरीही सतत पाणी पितच राहतात. हे शरीराच्या रचनेविरूध्द आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की घशाला कोरड पडेपर्यंत वाट बघावी. चुकीच्या वेळी पाणी पिणं आणि पाण्याच्या अतीसेवनानं शरीरातल्या मिठाचं अर्थात सोडीयमचं संतुलन बिघडतं. याला Hyponatremia असं म्हणतात. यामुळे कधी कधी गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Read full post

छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या की आता हृदयविकाराचा झटका येतो की काय म्हणून घबराट निर्माण होते .…

छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या की आता हृदयविकाराचा झटका येतो की काय म्हणून घबराट निर्माण होते . पण डॉक्टरांचे वारंवार असे सांगणे आहे की छाती दुखणे म्हणजे हृदयविकारच होणे असे समजण्याचे काही कारण नाही . इतरही कारणाने छाती दुखू शकते . पित्त वाढल्याने सुध्दा छाती दुखते . ही छाती दुखणे म्हणजे वेदना नसतात . तर छातीत जळजळ करायला लागते . पोटातील आम्ल उलट्या दिशेने वर सरकायला लागते आणि ते छातीपर्यंत येऊन छातीत जळजळ व्हायला लागते . अशा वेळी छातीत होणाऱ्या वेदना म्हणजे हृदयविकार नव्हे . त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही . दुसरी गोष्ट म्हणणे आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न केला तरीही छातीत वेदना होतात . या वेदना स्नायूला होत असतात . कारण वजन उचलण्याचा ताण स्नायूवर आलेला असतो . हृदयाचेही दुसरे काही विकार असतात . हृदयाचा प्रत्येक विकार म्हणजे नव्हे . तेव्हा हृदयविकाराला सोडून हृदयाची इतर दुखणी होतात तेव्हाही छाती दुखू शकते . न्युमोनिया झाल्यानंतरसुध्दा छातीत वेदना होऊ शकतात . हा विकार सर्दीबरोबरच यकृतात जंतू संसर्ग झाल्यामुळे होतो आणि त्यामुळे छातीत वेदना होऊ शकतात .

छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या की आता हृदयविकाराचा झटका येतो की काय म्हणून घबराट निर्माण होते .… post imageRead full post

खरी अंधश्रद्धा

स्वतः ला विज्ञानवादी म्हणून घेणारे लोकसुद्धा अंधश्रद्धेला बळी पडले. ते कसे ते पहा. विज्ञानाचा आधार घ्यावा पण अध्यात्म ला नाव ठेऊन नव्हे. प्रथम् श्रद्धा म्हणजे काय? तर श्रद्धा म्हणेचच विश्वास ✔ T.V वर दाखवलेले जाणा-या जाहिराती ही खरी अंधश्रद्धा पसरवतात आणि याला बळी पडतात स्वतःला विज्ञानवादी कस काय म्हणू शकतात... ते कसे तर ,👇🏻 फेयर लवली लावल्यावर् माणुस गोरा होतो म्हणे आणि याचा वापर विज्ञानवादी लोक आवडीने करतात. अश्या क्रीम लावून जर माणुस गोरा झाला असता तर जगात कोण काळा राहिला च नसता ना? आता बघा या लोकांनी त्या क्रीम वर् आपली श्रद्धा (विश्वास)ठेवला आणि या असल्या क्रीम वर हे विज्ञानवादी लोक बळी पडतात ना. आता सांगा ही अंधश्रद्धा नव्हे का? अजुन बोर्नव्हीटा,हॉर्लिक्स,कोम्पलान ई.हे पावडर दुधात टाकल्याने म्हणे पोर हुशार होतात .पोरांची बुद्धि तेज होती म्हणे? आता मला सांगा मग आपल्या भारतीय महात्म्यांनी कोणता बोर्नव्हीटा पिला होता. उलट भारतीय महात्म्यांना नीट पोटभर अन्न हि मिळाले नाही तरि त्यांची बुद्धि तेज होती. मग ही अंधश्रद्धा नव्हे का? मके सेंट मारल्याने स्त्रियां मागे लागतात. ही तर पक्की अंधश्रद्धाच आहे आणि याचा वापर जास्त विज्ञानवादी लोकच करतात. अजुन एक जाहिरात आहे. आपण पाहिली असेल या नसेल ती जाहिरात अशी की,एक माणसाला पहाडावरुन उडी मरायची होती त्याला भीति वाटत होती आणि त्याला एक साबण सापड़तो आणि तो साबण हा माणुस अंगाला चोळतो आणि त्याला जोश येतो आणि तो त्या पहाड़ीवरुन उडी मारतो. आता हा तर खरा अंधश्रद्धेचा कळसच झाला. आता काय काय तर मंडळी तर जी अंधश्रद्धा नाही त्या गोष्टीची पोस्ट बनवून पाठवणार आणि काही मंडळी ती शेयरही करणार.

Read full post