Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Ayurvedic Clinic, Allergist, Sexologist, straight from our business.

*🍾🥃दारू सोडवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय*

जास्त प्रमाणात मद्यपान करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन टाळले पाहिजे. दारूचे व्यसन खूप वाईट आहे जे सहजासहजी सोडले जात नाही. जर तुम्हाला ते सोडायचे असेल तर तुम्हाला दारू सोडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय मदत करू शकतील... *कारल्याचा रस* कारल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे निरोगी राहण्यासाठी फायदेशीर मानले जातात. कारली चवीला कडू लागु शकते पण कारल्याच्या रसाचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिटॅमिन ए, बी, सी आणि खनिजे - कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबे, पोटॅशियम सर्वात जास्त कारल्यात आढळतात. अल्कोहोलचे व्यसन सोडण्यासाठी कारल्याचा रस नियमित सेवन करावा. हे केवळ दारूचे व्यसन सोडण्यास मदत करत नाही तर आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ताक घालून त्याची चव सुधारू शकता. *दारू सोडण्यासाठी द्राक्षे* द्राक्ष हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे, त्यात भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात. द्राक्षे खाण्याचे फायदे खूप आहेत कारण द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, के, सी तसेच व्हिटॅमिन बी 6 देखील आढळतात. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियमसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्हाला मद्यपान सोडायचे असेल तर द्राक्षे तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. यासाठी वाइनऐवजी साधारण महिनाभर द्राक्षांचे सेवन करावे. कारण द्राक्षापासून वाईन देखील बनवली जाते, त्यामुळे द्राक्षांचे सेवन केल्याने तुम्ही दारूच्या व्यसनापासून मुक्त होऊ शकता. *अजवाइन(ओआ) पाणी-* अजवाइन हा एक खास मसाला आहे ज्यामध्ये आनंददायी सुगंध असलेली

Read full post

*मधुमेहाकडे नाही तर प्रमेहाकडे लक्ष द्या*

*14 नोव्हेंबर- जागतिक मधुमेह दिन* *प्रमेहाची कारणे* - प्रमेह या रोगाची कारणे आयुर्वेद ग्रंथांमध्ये वर्णन केली आहेत. मधुमेहाला तीच लागू होतात. 👉🏽खूप वेळ आराम करणे, झोप घेणे. 👉🏽अधिक खाण्याची सवय असणे. 👉🏽दह्य़ासारखे स्राव वाढवणारे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे. 👉🏽थंड प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस खाणे. 👉🏽गुळापासून बनवलेले विविध पदार्थ जास्त प्रमाणात खाणे. 👉🏽अतिथंड, अतिस्निग्ध असे पदार्थ खाणे तसेच त्यांचे प्रमाणही जास्त असणे. 👉🏽कफदोष वाढवणाऱ्या इतरही पदार्थाचे जास्त सेवन. मधुमेही रोग्यांची नीट विचारपूस केली तर वर वर्णिलेल्या कारणांपैकी काहीतरी कारण त्या रोग्यांमध्ये दिसून येते. तेव्हा आहारा-विहारामधील बेशिस्त, अनियमितता हे बऱ्याच आजारांना आमंत्रण ठरते हे पुन्हा एकदा या निमिताने लक्षात घ्यावयास हवे. *प्रमेह कसा होतो?* वर सांगितलेली कारणे घडल्यामुळे शरीरामध्ये ‘विकृत’ कफदोष निर्माण होतो. त्याला ‘क्लेद’ अशी संज्ञा आयुर्वेदाने दिली आहे. या क्लेदामुळे शरीरामध्ये जडत्व येते. कोणत्याही कामांत उत्साह वाटेनासा होतो. हा क्लेद मूत्रवहन संस्थेमध्ये जाऊन त्या ठिकाणी विकृती निर्माण करतो. आणि विविध प्रकारचे मेह उत्पन्न होतात. त्यापैकी एक मधुमेह होय. मधुमेही व्यक्तींमध्ये क्लेद वाढल्याने हळूहळू धातू शिथिल व्हायला लागतात. मूत्राला माधुर्य येते. पुढे पुढे तर शरीरातील सातही धातूंचे ‘ओज’ शरीराबाहेर जाऊ लागते आणि म्हणूनच मधुमेही व्यक्ती चिडचिड करताना आढळतात. काहींमध्ये एखाद्या विषयीची भीती निर्माण होते. ही लक्षणे ‘ओज’ कमी झाल्याने होतात. या रोगात एकूणच शरीराचे ‘माधुर्य’ वाढते. बऱ्याच

Read full post

*शरीरातील या बदलांकडे दुर्लक्ष करू नका.*

कॅन्सरचे वेळीच निधान झाले नाही तर, रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. बर्‍याच लोकांना वाटतं की, कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. परंतु, तसं नाही, काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात. अनेकदा असे घडते की आपण या लक्षणांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. *वजन कमी होणे:-* जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर, सावध व्हा. हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. *शरीरात सूज किंवा गाठ:-* शरीराच्या कोणत्याही भागात सूज किंवा गाठ दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. ओटीपोटात, स्तनात किंवा अंडकोषात गाठ कर्करोगामुळं असू शकतं. *सतत खोकला:-* सतत खोकला हेदेखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं. कफ सतत तीन ते चार आठवडे राहिल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. सतत खोकला, कफासह रक्त येणं, श्वास घेण्यास त्रास होणं ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. *तीळ किंवा चामखीळीमध्ये बदल:-* तीळ किंवा चामखीळीमध्ये काही बदल दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. बहुतेक लोकांना ते लक्षात येत नाही. परंतु, ते त्वचेच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. नवीन चामखीळ दिसल्यास किंवा त्वचेवर आधीच अस्तित्वात असलेल्या चामखीळ किंवा तीळाच्या रंगात आणि आकारात बदल होत असल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. *लघवीमध्ये रक्त दिसणं:-* लघवीतील रक्त हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही आतड्याच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. यासाठी मलविसर्जनाच्या आणि लघवीला जाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. म्हणजेच, तुम्ही नेहमीपेक्ष

Read full post

*टाच:दुखी*

*टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. त्यामुळे अनेक वेळा हिवाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते.* 🦶झोपेच्या अगोदर कोमट पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि या पाण्यामध्ये १५ ते २० मिनीटे पाय टाकून बसावे. या पाण्यामुळे पायांना शेक मिळतो व टाचदुखी कमी होते. 🦶पायाच्या बोटांनी टॉवेल जवळ आणण्याचा प्रयत्न करणे. यामध्ये जमिनीवर टॉवेल पसरावा आणि त्यावर पाय ठेवून पायांच्या बोटांच्या मदतीने टॉवेलचं एक टोक आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणे. 🦶विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन त्यावर रुईचे पान बांधावे आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्यावा. 🦶गोडेतेल आणि मीठ एकत्र करुन हा लेप टाचेवर लावाला आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवावी.

Read full post

*सांधेदुखी व त्यावरील घरगुती उपाय:-*

चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो. 1) सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राहील तो पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल. 2) दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंदमुळाची भरड चार कप पाण्यात उकळावे व एक कप पाणी राहिल्यावर गळून घ्यावे. व पिऊन घ्यावे. हा काढा नियमित घेतल्यास सांधेदुखी मध्ये निश्चित आराम मिळेल. 3) निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सुज व वेदना कमी होतात. 4) मूठभर ओवा एरंडतेल तव्यावर गरम करून सुती कापडात बांधून पोटली करावी व त्याने दुखणारा सांधा शेकावा. 5) एरंडची पाने वाफवून कुटून दुखत असलेल्या सांध्यावर बांधावे. 6) रोजची कनिक मळताना चमचाभर एरंड तेलाचे मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलका खावा. याने सांधेदुखीचा व सर्व सांधे संबंधित समस्या दूर होतात. 7) सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो. रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये, वजन जास्त असल्यास कमी करावे, नियमित योगासने करावी, व सकाळी चालायला जावे. असे केल्यास सांधे दुखीचा त्रास होत नाही. तीळ व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तेल नियमित लावल्यास व आहारामध्ये योग्य प्रमाणात साजूक तूप समाविष्ट केल्यास शरीराचे स्नेहन होऊन सांधेदुखी कमी होते.

Read full post

*वाढवायची दृष्टी तर, करा या थेरपी*👀

सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच स्क्रीनशी संबंध येतोच. ऑनलाईन स्कूल वर्क फ्रॉम होम यामुळे जास्तीत जास्त वेळ मोबाईल लॅपटॉप याच्यासमोरच जातो. त्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो परिणामी डोळ्यांची दृष्टी कमजोर होते आणि मग नीट दिसण्यासाठी चष्मा लावण्याशिवाय पर्याय नसतो. अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत बऱ्याच जणांना अकाली चष्मा लागत आहे. सतत अनेक तास काम करणं आणि बदलत्या जीवनशैलीमुळे चष्मा लागतो आणि चष्म्याचा नंबर वाढतही जातो. दृष्टीची क्षमता वाढवण्यासाठी विशेष असं औषध नाही; पण अशा अनेक थेरपी आहेत, की ज्यांच्या साह्याने चष्म्याचा नंबर नक्कीच कमी केला जाऊ शकतो. *शिरोधारा थेरपी:* ही अनेक बाबींसाठी फायदेशीर आहे. या थेरपीमध्ये रुग्णाला टेबलावर झोपवलं जातं. त्यानंतर व्यक्तीच्या कपाळावर सुमारे 30-45 मिनिटं औषधी तेल ओतलं जातं. निद्रानाश, मानसिक तणाव, झोप न लागणे, डोळेदुखी या सर्व समस्या कमी करण्यास शिरोधारा थेरपी मदत करते. काही जणांना मात्र ही थेरपी धोकादायक वाटते. *तर्पण थेरपी :* या थेरपीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. नेत्रआरोग्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरते. या थेरपीमध्ये डोळ्यांभोवती पिठाचा गोळा लावला जातो. डोळ्यांभवती बनलेल्या या खळग्यात औषधी वनस्पतींपासून तयार केलेलं तूप ओतलं जातं. यामुळे डोळ्यांच्या पेशींना पोषण मिळतं. यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. तसंच डोळ्यांचा थकवाही दूर होतो. *आश्चोतन थेरपी :* सकस आहार घेऊन आणि व्यायाम करूनही चष्म्याचा नंबर कमी होत नसेल तर आश्चोतन थेरपी खूप उपयुक्त ठरते. आश्चोतन थेरपीमध्ये औषधी वनस्पतींपासून त

Read full post

*शरीरातील या बदलांकडे दुर्लक्ष करू नका.*

कॅन्सरचे वेळीच निधान झाले नाही तर, रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. बर्‍याच लोकांना वाटतं की, कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. परंतु, तसं नाही, काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात. अनेकदा असे घडते की आपण या लक्षणांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. *वजन कमी होणे:-* जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर, सावध व्हा. हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. *शरीरात सूज किंवा गाठ:-* शरीराच्या कोणत्याही भागात सूज किंवा गाठ दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. ओटीपोटात, स्तनात किंवा अंडकोषात गाठ कर्करोगामुळं असू शकतं. *सतत खोकला:-* सतत खोकला हेदेखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं. कफ सतत तीन ते चार आठवडे राहिल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. सतत खोकला, कफासह रक्त येणं, श्वास घेण्यास त्रास होणं ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. *तीळ किंवा चामखीळीमध्ये बदल:-* तीळ किंवा चामखीळीमध्ये काही बदल दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. बहुतेक लोकांना ते लक्षात येत नाही. परंतु, ते त्वचेच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. नवीन चामखीळ दिसल्यास किंवा त्वचेवर आधीच अस्तित्वात असलेल्या चामखीळ किंवा तीळाच्या रंगात आणि आकारात बदल होत असल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. *लघवीमध्ये रक्त दिसणं:-* लघवीतील रक्त हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही आतड्याच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. यासाठी मलविसर्जनाच्या आणि लघवीला जाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. म्हणजेच, तुम्ही नेहमीपेक्ष

Read full post

*हिवाळ्यात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान उबदार राहण्यास मद…

*हिवाळ्यात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान उबदार राहण्यास मदत होते. डिंकामध्ये अनेक पोषक तत्व असल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. डिंकाचे सेवन केल्याने थकवा नाहीसा होतो. तसेच गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारे घटक डिंकामध्ये असतात. अशक्तपणा जाणवत असेल तर डिंक आणि डिंकाचे लाडू खाणे उत्तम मानले जाते. डिंक शरीरास गरम असल्यामुळे विशेषतः थंडीमध्ये डिंकाच्या लाडूचे सेवन केले जाते. डिंकाचा वापर सौंदर्य उत्पादनं, बेकरी उत्पादनं आणि आईसक्रिममध्ये करण्यात येतो.*

Read full post

*दुसऱ्याकडे पाहून आपल्या वजनाची तुलना करू नका.*

वजन जास्त असणे ही एक गंभीर बाब आहे, पण आपलं वजन खरच वाढलं आहे, की तुमच्या सहवासातील लोक बारीक आहेत, इतरांच्या वजनाची आपल्या वाजनाशी तुलना होऊ शकत नाही म्हणुन लक्षात ठेवा वजन काटा भरवशाचा का नसतो ? काही गोष्टी ज्या विचारात घेणे गरजेचे आहेत. - आपल्या शरीराचं वजन दोन प्रकारचं असतं- चरबीचं वजन आणि स्नायू - हाडांचं वजन. - वजन काट्याकडे बघून स्वत : च्या प्रकृतीचा अंदाज बांधता येत नाही. - आपल्या शरीरातल्या चरबीचं वजन किती आहे (शरीरात चरबीचं प्रमाण किती आहे) हे एकूण वजन किती आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं. उदा. सेरेना विल्यम्सचं(टेनिसपटू आहे, आणि वजन जवळपास 72 किलो) एकूण वजन खूप जास्त आहे, पण त्यात तिच्या स्नायू-हाडांचं वजन जास्त आहे, चरबीचं वजन तुलनेनं खूप कमी आहे. - तसेच फॅशन टीव्हीतल्या मॉडेल्सचं एकूण वजन खूप कमी असतं, त्या अगदी हडकुळ्या दिसतात, पण त्यांच्यातल्या काहींमध्ये चरबीचं प्रमाण तीस टक्क्यांपर्यंत जास्त असतं. - चरबीचं प्रमाण पुरुषांमध्ये 14- 18 % पर्यंत आणि बायकांमध्ये 16-22 % पर्यंत असणं आदर्श मानलं जातं. - त्यामुळे BMI (बॉडी - मासइंडेक्स) नुसारसुद्धा प्रकृतीचा अंदाज बांधू नये. *बॉडी मास इंडेक्स = वजन(किलो) : उंची(मीटर २)* कारण BMI मध्येही शरीराच्या एकूण वजनाचाच विचार होतो. एकूण वजनात चरबीच्या वजनाचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जात नाही. (समान BMI असलेल्या दोन व्यक्ती पूर्णपणे भिन्न दिसू शकतात कारण त्यांच्या शरीरातलं चरबीचं प्रमाण वेगळं असू शकतं. - उदा. जिच्या शरीरात जास्त चरबी आहे ती व्यक्ती खूप लठ्ठ पण अशक्त असू शकते आणि जिच्या शरीरात कमी चरबी आहे ती व्यक्ती सडपात

Read full post

आपल्याला सर्वसाधारणपणे आठ तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झो…

आपल्याला सर्वसाधारणपणे आठ तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही. काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही. *आपल्या झोपेवर ताबा मिळवण्यासाठी सवयी, व्यायाम प्रकार आणि आहार कसा असावा हे जाणून घेऊ* *१) ध्यानधारण करणे* झोपेसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ध्यान *२) मंत्रोच्चार* दिवसातून किमान एकदा तरी ओंकार करावा. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपण आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य विचार किंवा काळज्यांना दूर थोपवू शकतो. *३) योगासने करणे* नियमितपणे योग साधना करणाऱ्या लोकांना झोपेचे कसलेच त्रास होत नाही. दिवसातून किमान वीस मिनिटं योगाची प्रॅक्टिस करून शरीर, मन स्वस्थ ठेवणं हा सवयीचा भाग बनून जातो. *४)मसाज करणे* झोपेच्या समस्यांसाठी मसाज हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. नियमितपणे मसाज केल्याने झोपेचा दर्जा तर सुधारतोच पण मसाजमुळे टेन्शन, स्ट्रेस देखील दूर होतात. ज्यामुळे शांत झोप लागण्यासाठी मदत होते. *५) मॅग्नेशियम* आपल्या आहारातून अनेक प्रकारची खनिजे , व्हिटॅमिन आपल्या शरीरात जातच असतात. ह्यापैकी मॅग्नेशियम ह्या खनिजाची आपलाल्या चांगल्या झोपेसाठी गरज असते. *६) आवडते शांत संगीत ऐकणे* संगीत हा नैसर्गिक पेनकिलर म्हणून ओळखले जाते. शांत संगीतात आपले दुखणे कमी करायची क्षमता असते. संगीतामुळे आपले मन शांत होते, शरीर सैल होते त्यामुळे आपल्याला झोप यायला सुरुवात होते. *झोप नीट येत नसेल, किंवा आली तरी सलग शांत झोप होत नसेल तर हे उपाय करून बघा. याने नक्कीच तुम्हाला फ

Read full post

*थंडीचे दिवस जवळ आले , की आपल्या महाराष्ट्रीय घराच्या महिन्याच्या किराणा यादीत एका गोष्टीची हमखास…

*थंडीचे दिवस जवळ आले , की आपल्या महाराष्ट्रीय घराच्या महिन्याच्या किराणा यादीत एका गोष्टीची हमखास वाढ होते , ती म्हणजे बाजरी . थंडीच्या दिवसात आपण बाजरीची भाकरी , बाजरीची खिचडी , थालीपीठ असे पदार्थ करतो . बाजरी ही ‘ ग्लुटेन फ्री ’ असल्याने गव्हापेक्षा किंवा तांदळापेक्षा जास्त आरोग्यपूर्ण असल्याने तिचा वापर आपण एरवी सुद्धा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करू शकतो.*

Read full post

*कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त त्रासदायकच...*

आज ही बरेच लोक कोरो'ना होऊ नये म्हणून वारंवार हातावर सैनिटाइजर वापरतात. परंतु आपणास माहिती आहे का की जास्त सैनिटाइजर वापर केल्याने आपल्या आरोग्यास बर्‍याच प्रकारे नुकसान होऊ शकते. *1- ट्रायक्लोझनमुळे त्वचेचे नुकसान होते* सॅनिटायझरमध्ये ट्रायक्लोझन नावाचे एक रसायन असते, ज्यामुळे हाताची त्वचेतुन त्वरित शोषून घेते. जेव्हा ते रक्ताभिसरणात सामील होते, तेव्हा ते स्नायूंच्या समन्वयासाठी आवश्यक सेल-संप्रेषणास व्यत्यय आणते. याच्या वापरामुळे वंध्यत्व आणि हृदयरोग होण्याची शक्यता वाढू शकते. *2- हात कोरडे होतात* सॅनिटायझरच्या अत्यधिक वापरामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. खरं तर, हे हँड सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे आहे. अल्कोहोल त्वचा कोरडी करते. आपण ते कमी वापरावे. *3- सैनिटाइजर घाण स्वच्छ करत नाही* जर आपल्याला असे वाटले आहे की सैनिटाइजर ने हातावरची घाण साफ होते तर आपण चुकीचे आहात. सैनिटाइजर घाण स्वच्छ करीत नाही आणि घाणेरडे हात असल्यास बॅक्टेरिया देखील मरत नाहीत, कारण घाणीमुळे सॅनिटायझरचा प्रभाव कमी होतो. *4-अधिक वापरामुळे हानिकारक जीवाणू तयार होतात* एका संशोधनानुसार, अँटी-बॅक्टेरियल घटक असलेले हँड सॅनिटायझर्स बहुतेकदा प्रतिजैविक-प्रतिरोधक बॅक्टेरिया विकसित करतात. हे जीवाणू धोकादायक आहेत. *5-प्रतिकारशक्ती प्रभावित आहे* एका अभ्यासानुसार असे म्हटले आहे की जर मुले हँड सॅनिटायझर्सचा जास्त वापर करतात तर त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. संशोधनात सामील झालेल्या मुलांच्या मूत्रात दाहक घटक सी-रिएक्टिव प्रोटीन आढळला

Read full post