*हिवाळ्यात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान उबदार राहण्यास मद…
Published
*हिवाळ्यात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान उबदार राहण्यास मदत होते. डिंकामध्ये अनेक पोषक तत्व असल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. डिंकाचे सेवन केल्याने थकवा नाहीसा होतो. तसेच गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारे घटक डिंकामध्ये असतात. अशक्तपणा जाणवत असेल तर डिंक आणि डिंकाचे लाडू खाणे उत्तम मानले जाते. डिंक शरीरास गरम असल्यामुळे विशेषतः थंडीमध्ये डिंकाच्या लाडूचे सेवन केले जाते. डिंकाचा वापर सौंदर्य उत्पादनं, बेकरी उत्पादनं आणि आईसक्रिममध्ये करण्यात येतो.*