*मधुमेहाकडे नाही तर प्रमेहाकडे लक्ष द्या*
*मधुमेहाकडे नाही तर प्रमेहाकडे लक्ष द्या*
*14 नोव्हेंबर- जागतिक मधुमेह दिन*
*प्रमेहाची कारणे* - प्रमेह या रोगाची कारणे आयुर्वेद ग्रंथांमध्ये वर्णन केली आहेत. मधुमेहाला तीच लागू होतात.
👉🏽खूप वेळ आराम करणे, झोप घेणे. 👉🏽अधिक खाण्याची सवय असणे. 👉🏽दह्य़ासारखे स्राव वाढवणारे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे. 👉🏽थंड प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे मांस खाणे. 👉🏽गुळापासून बनवलेले विविध पदार्थ जास्त प्रमाणात खाणे. 👉🏽अतिथंड, अतिस्निग्ध असे पदार्थ खाणे तसेच त्यांचे प्रमाणही जास्त असणे. 👉🏽कफदोष वाढवणाऱ्या इतरही पदार्थाचे जास्त सेवन.
मधुमेही रोग्यांची नीट विचारपूस केली तर वर वर्णिलेल्या कारणांपैकी काहीतरी कारण त्या रोग्यांमध्ये दिसून येते. तेव्हा आहारा-विहारामधील बेशिस्त, अनियमितता हे बऱ्याच आजारांना आमंत्रण ठरते हे पुन्हा एकदा या निमिताने लक्षात घ्यावयास हवे.
*प्रमेह कसा होतो?* वर सांगितलेली कारणे घडल्यामुळे शरीरामध्ये ‘विकृत’ कफदोष निर्माण होतो. त्याला ‘क्लेद’ अशी संज्ञा आयुर्वेदाने दिली आहे. या क्लेदामुळे शरीरामध्ये जडत्व येते. कोणत्याही कामांत उत्साह वाटेनासा होतो. हा क्लेद मूत्रवहन संस्थेमध्ये जाऊन त्या ठिकाणी विकृती निर्माण करतो. आणि विविध प्रकारचे मेह उत्पन्न होतात. त्यापैकी एक मधुमेह होय. मधुमेही व्यक्तींमध्ये क्लेद वाढल्याने हळूहळू धातू शिथिल व्हायला लागतात. मूत्राला माधुर्य येते. पुढे पुढे तर शरीरातील सातही धातूंचे ‘ओज’ शरीराबाहेर जाऊ लागते आणि म्हणूनच मधुमेही व्यक्ती चिडचिड करताना आढळतात. काहींमध्ये एखाद्या विषयीची भीती निर्माण होते. ही लक्षणे ‘ओज’ कमी झाल्याने होतात. या रोगात एकूणच शरीराचे ‘माधुर्य’ वाढते. बऱ्याच