*वाढवायची दृष्टी तर, करा या थेरपी*👀
*वाढवायची दृष्टी तर, करा या थेरपी*👀
सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच स्क्रीनशी संबंध येतोच. ऑनलाईन स्कूल वर्क फ्रॉम होम यामुळे जास्तीत जास्त वेळ मोबाईल लॅपटॉप याच्यासमोरच जातो. त्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो परिणामी डोळ्यांची दृष्टी कमजोर होते आणि मग नीट दिसण्यासाठी चष्मा लावण्याशिवाय पर्याय नसतो. अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत बऱ्याच जणांना अकाली चष्मा लागत आहे.
सतत अनेक तास काम करणं आणि बदलत्या जीवनशैलीमुळे चष्मा लागतो आणि चष्म्याचा नंबर वाढतही जातो. दृष्टीची क्षमता वाढवण्यासाठी विशेष असं औषध नाही; पण अशा अनेक थेरपी आहेत, की ज्यांच्या साह्याने चष्म्याचा नंबर नक्कीच कमी केला जाऊ शकतो.
*शिरोधारा थेरपी:* ही अनेक बाबींसाठी फायदेशीर आहे. या थेरपीमध्ये रुग्णाला टेबलावर झोपवलं जातं. त्यानंतर व्यक्तीच्या कपाळावर सुमारे 30-45 मिनिटं औषधी तेल ओतलं जातं. निद्रानाश, मानसिक तणाव, झोप न लागणे, डोळेदुखी या सर्व समस्या कमी करण्यास शिरोधारा थेरपी मदत करते. काही जणांना मात्र ही थेरपी धोकादायक वाटते.
*तर्पण थेरपी :* या थेरपीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. नेत्रआरोग्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरते. या थेरपीमध्ये डोळ्यांभोवती पिठाचा गोळा लावला जातो. डोळ्यांभवती बनलेल्या या खळग्यात औषधी वनस्पतींपासून तयार केलेलं तूप ओतलं जातं. यामुळे डोळ्यांच्या पेशींना पोषण मिळतं. यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. तसंच डोळ्यांचा थकवाही दूर होतो.
*आश्चोतन थेरपी :* सकस आहार घेऊन आणि व्यायाम करूनही चष्म्याचा नंबर कमी होत नसेल तर आश्चोतन थेरपी खूप उपयुक्त ठरते. आश्चोतन थेरपीमध्ये औषधी वनस्पतींपासून त