#obesity #overweight #punguanac9 #obese #obesitysurgery #unene #uzito #afyayangu #weightmanagemen…
#obesity #overweight #punguanac9 #obese #obesitysurgery #unene #uzito #afyayangu #weightmanagementprogram #my600lblife #lookbetter #fatgirlfedup #cleansingprogram #healthieryou #afya #fightingobesity #obesitysurvivor #mytransphormation #obesetobeast #diabetes #obezite #obezitecerrahisi #obesitemorbide #dsm #bypass2020 #flatummygoals #bodymassindex #mideküçültme #weightloss #obesitykills*भारतीय व्यायाम पद्धतीच उत्तम*
फिटनेसबद्दल जागरूक असणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातील काहींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, “सिक्सपॅक’ची त्यांच्यात जबरदस्त “क्रेझ’ दिसून आली. ऋतिक अन् विद्दुत जामवाल व संग्राम चौघुले यांच्या सारखे आपलेही दंड मजबूत असावे, असे त्यांना वाटते.त्याकरिता जिम मध्ये जाणे आणि सिक्सपॅक ची मायावी स्वप्ने बघणे हा आजकालच्या तरुण पिढीचा नवा फंडा आहे. शारीरिक सौंदर्य असणे हा आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे पण तो अविभाज्य घटक आहे असे नाही …. आधुनिक जिम आणि तिथे केले जाणारे व्यायाम यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर अनेक फायदे तोटे आमच्या लक्षात आले.पण पुन्हा एकदा सांगावेसे वाटते कि संयमित आणि योग्य व्यायाम यासोबतच परिपूर्ण आहार घेतला तर आपण जिम चा फायदा करून घेऊ शकतो यात अजिबात शंका नाही .
*आयुर्वेदाचा दृष्टीकोन :* मानवी शरीर हे रस , रक्त , मांस . मेद . अस्थी , मज्जा , शुक्र या सात धातूंपासून बनले आहे . रसापासून रक्त , रक्तापासून मेद , मेदापासून अस्थी ….. अशा क्रमाने एकेका धातूचे आधीच्या धातू पासून पोषण होते …. आपण लक्ष देऊन पाहिले तर आधुनिक व्यायाम पद्धतीत फक्त मांस धातू पुष्ट करण्याकडे कल दिसतो .