आमवात
एरंडमुलादी बस्ती,मुस्तादि यापन बस्ती,बलादि बस्ती अशा विविध बस्तींचा उपयोग सांध्यात साठलेल्या दोषांना बाहेर काढण्यासाठी होतो. *झिजलेल्या हाडांसाठी तथा कुर्च्यांसाठी गुडूची सारख्या अस्थीपोषक औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेल्या दुधामध्ये सिद्ध तूप तथा मांसरस घालून बस्ती दिला असता चांगला परिणाम दिसून येतो.* कधीकधी अवस्थेनुसार औषधांच्या काढ्याचा परिषेक,उपनाह लेप,अग्निकर्म,रक्तमोक्षण अशा विविध पंचकर्मांच्या उपकल्पनांचा विचार करावा लागतो.व्याधी आटोक्यात आल्यानंतर सुंठ्यादी घृत, धानवंतर घृत,अमृतादी घृत,अशा विविध तुपांचा सहज पचेल अशा मात्रेत उपयोग करावा. अमृतारीष्ट, द्रा क्षारीष्ट,दशमुलारिष्ट अशा विविध औषधांनी भूक वाढतेच शिवाय सांध्यातील सूज,जडपणा व वेदना कमी होतात.कुळथाचे कढण,पालेभाज्या किंवा फळभाज्यांचे सूप,गव्हाचा फुलका,ज्वारीची भाकरी,पडवळ,शेवगा,कारले,तांबड्या साळीचा भात,मोड आलेल्या कडधान्यांचे कढण