Skip to content
Pune, Maharashtra, 411028

Business hours

Shree Vishwasudha Ayurvedic Clinic and Panchakarma Center "

Monday
10am-9pm
Tuesday
10am-9pm
Wednesday
10am-9pm
Thursday
10am-9pm
Friday
10am-9pm
Saturday
10am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

+919881947290

*मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदला…*

*मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदला…* महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर, या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. मुलींनी या सवयी काढून टाकण्यावर आणि त्या सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते.

*मासिक पाळीवर परिणाम करणाऱ्या वाईट सवयी*

*खूप झोपणे* महिलांनी जास्त वेळ झोपू नये. आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास, तुमची मासिक पाळी देखील नियमित होईल.

*वजनात बदल* अचानक वजनात फरक दिसून आला, तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते.

*आहारात अडथळा* उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. जरी तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते. त्यामुळे सकस आहार खा. बाहेरील जंक फूड जास्त खाणे टाळा. ज्या पदार्थांत पोषक तत्वांचा समावेश असेल, असे पदार्थ खा.

*गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेक*

*मासिक पाळी वेळेत येत नाही? या पाच सवयी बदला…*

Next posts