*निलीभृंग्यादी तेल*
निलीभृंग्यादी तेल हे आयुर्वेदिक औषधी गुणांनी युक्त तेल आहे. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, केस गळणे, कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे, टक्कल पडणे, केसांची मुळे फुटणे यावर उपयुक्त आहे. हे हर्बल तेल *" केरळ आयुर्वेदिक तत्वांवर "* आधारित आहे.
*तेलातील घटक :-* १) नीली स्वरस - (Indigofera Tinctoria) २) भृंगराज - (Eclipta Alba) ३) शतक्रतुलाता (Kamasphota Swarasa) ४) आमलकी ( आवळा) (Emblica officinalis) ५) गोक्षीर ( गाईचे दूध) (Cows milk) ६) नलिकेरा क्षीर ( नारळाचे दूध) (Coconut milk) ७) महषीक्षीरा ( म्हशीचे दूध) ८) ताईला ( खोबरेल तेल) (Pure Cocunut Oil) ९) यष्टी ( जेष्ठमध) १०) गुंजामूळ (Abrus precatorius) ११) अंजना
*तेल कसे वापरायचे :-* १) हे तेल फक्त बाह्य वापरासाठीच वापरायचे आहे. हे स्काल्पवर लावले जाते. त्यानंतर हलक्या हाताने पाच मिनिटे मसाज करावा. २) हे तेल रात्री लावता येते आणि सकाळी केस धुता येतात. ३) आंघोळीच्या आधी अर्धा तास देखील हे तेल लावू शकता. ४) थोड्या प्रमाणात ते दररोज लागू केले जाऊ शकते.
*केसांचे तेल कसे धुवायचे* १) केसांचे तेल धुण्यासाठी हर्बल हेयर वाॅश पावडर वापरणे चांगले. हेयर वाॅश पावडर ने एक किंवा दोन वेळा धुतल्याने केसातील तेल निघून जाईल. केसांवर काही प्रमाणात तेलकटपणा राहिला तरी ते चांगले आहे. २) पारंपारिक ग्रंथांमध्ये केस आणि चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा उल्लेख आहे. ( संदर्भ- अष्टांग संग्रह,सूत्रस्थान, दिनचर्या अध्याय) पण तेलकट केस धुण्यासाठी कोमट पाण्याचाही वापर केला जाऊ शकतो. ३) केस धुण्यासाठी खूप गरम पाणी टाळा.
*विशेष काळजी* काही लोकांनी सुरूवातीच्या काही आठवड्यात केस गळत असल्याचे पाहिले आहे. परंतु २-३ महिन्यांच्या