!! श्री !!
आयुर्वेदोक्त सुवर्णप्राशनं संस्कार विधी
बाळाचा सर्वांगीण विकासासाठी रोगप्रतिकारक शक्ती वर्धक व बुध्दी वर्धक शास्त्रोक्त १६ संस्कारांपैकी एक महत्वपूर्ण संस्कार सुवर्णप्राशनं।
आपलें मुल हुशार व सुदृढ असावे असे कोणत्या पालकांना वाटत नाही । अर्थात प्रत्येक पालकांची ईच्छा असते की आपले मुल हुशार व बुद्धिमान असावे। त्याकरिता प्रत्येक पालक धडपडून उत्तमोत्तम सुविधा देण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करीत असतात।मात्र हे प्रयत्न त्या त्या सुयोग्य वयात घडत नाहीत ।आयुर्वेदानुसार बुद्धी व आरोग्याच्या वाढीसाठी प्रयत्न करता येतात। पुराणकाळापासून भारतवर्षात सुरू असलेले सुवर्णप्राशनं संस्कार प्रत्येक बालकास अत्यंत आवश्यक असे आहे। संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की सुवर्ण हे बुद्धीवर्धक व व्याधी प्रतिकरक्षमत्व वाढवणारे आहे। सुवर्णप्राशनं विधी म्हणजे सुवर्णभस्म व आयुर्वेदातील बुद्धिवर्धक औषधे यांचा पुरातन ग्रंथानुसार केलेला अमृतमय संगम आहे। बालकाचा जन्मानंतर एकूण १६ संस्कार आयुर्वेदाने सांगितले आहेत। त्यातील १ महत्वाचा संस्कार म्हणजे सुवर्णप्राशनं संस्कार होय।